नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे आदिवासी संघटनेचा चक्का जाम आंदोलन नांदगाव शहरातील मालेगांव रोड येथुन आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका अध्यक्ष प्रभाकर निंबारे , आदिवासी आदिम सेना महिला तालुका अध्यक्ष जयश्री डोळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला होता .शहरातील प्रमुख मार्ग मालेगांव रोड शनिमंदिर मार्ग हुतात्मा चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले . आदिवासी बांधव एकत्र येवुन आपल्या प्रमुख मागण्या करीता घोषणा बाजी करत शिंदे, फडणवीस सरकार च्या विरोधात घोषणा देत हुतात्मा चौकात तील परीसर दुमदुमन टाकला . यावेऴी आदिवासी एकलव्य संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रतन सोनवणे,अदिम आदिवासी सेना महिला तालुका अध्यक्ष जयश्री डोऴे यांनी सरकारचा खरपुस समाचार घेतला एकलव्य संघटना,आखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आदिवासी अदिम सेना आदिवासी क्रांतिकारक राजा ठाकर फाउंडेशन महाराष्ट्र, राज्य या संघटना पदाधिकारी,व आपल्या प्रमुख मागण्या करीता हुतात्मा चौकात जोरदार आंदोलन करत चक्का जाम केला S,T राखीव असलेल्या आरक्षणा मध्ये धनगर जातीचा समावेश करण्यात येवु नये. आदिवासी जमातीत धनगर जाती ने घुसखोरी करु नये,या बाबत नांदगाव नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांना निवेदन देण्यात आले. ह्या वेळी आदिवासी समाज मोठ्या सख्येंने उपस्थित होता. नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी , सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन खंडागऴे, पोलिस उपनिरक्षक मनोज वाघमारे, संतोष बहाकर यांनी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे माघारीनंतर युतीचं ...
No comments:
Post a Comment