नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथील गुरुकृपा नगर नवदुर्गा महिला मंडळाने होम मिनिस्टर... खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी निवेदक व विनोदी व्यक्तिमत्व अविनाश सोनवणे( सर) यांनी भाऊजींची भूमिका साकारली. या कार्यक्रमाचे आयोजन दि. २२ व २३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. सौ. निशा सोनवणे यांनी अविनाश सोनवणे यांचे औक्षण केले. त्यानंतर सर्व महिला स्पर्धकांनी अविनाश भाऊजींचे जल्लोषात स्वागत केले. सर्व प्रेक्षक वर्गाला नमस्कार करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात सुरुवातीला सर्व महिला स्पर्धकांनी उखाणे घेतले. याप्रसंगी भाऊजींनी सर्व प्रेक्षकांना पोट धरून हसवले. या कार्यक्रमात अनेक मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. भाऊजींनी सर्व महिला स्पर्धकांबरोबर गप्पागोष्टी केल्या. या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांनी भाग घेतला होता . त्यातून सौ. भाग्यश्री मोरे या विजयी ठरत त्यांनी पैठणी मिळवून प्रथम बक्षीस मिळवले तर सौ. लिना जाधव या उपविजयी ठरल्या. भाऊजींनी दोन्हीही वहिनींना पैठणी देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी सर्व महिलांनी व प्रेक्षकांनी जल्लोष साजरा केला. खेळाच्या स्पर्धा सुरू असताना सौ. ज्योती वाघ व सौ. कविता आहेर यांनी पंच म्हणून भूमिका पार पाडली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्या मीनाताई जाधव, आशा पगार, वर्षा आहेर , शिंदे ताई , तुरकुणे, वसंतराव जाधव, दिलीप मोरे , संजय आहेर, सानप बाबा , बाबासाहेब बागुल, बाळासाहेब जाधव सर,अशोक जाधव साहेब ,प्रवीण खैरनार आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अविनाश सोनवणे यांनी केले. नांदगाव नगरीचे मा. नगराध्यक्ष राजेश कवडे तसेच अंजुमताई कांदे यांनी देखील मंडळाला सदिच्छा भेट दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment