नांदगाव (प्रतिनिधी ) - तहसील कार्यालयासह सर्वच शासकीय कार्यलयात भ्रष्टाचार चालतो हे जगजाहीर आहे . मात्र प्रशासकीय अधिकारी यांचे शिक्केच जर नागरीक स्वतःच्या हाताने मारून घेत असतील तर ..? हो हे घडते आहे. आणि तेही नांदगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात नांदगाव तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भोंगळ कारभार सुरू असुन, पिवळे रेशनकार्ड केशरी रेशनकार्ड यांचे रेट फिक्स असुन राजकीय नेत्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर काम सुरू असतात . मात्र आता तर अजब घटना बघायला मिळाली आहे .नांदगाव तहसील कार्यलयात एक महिला व एक तरुण स्वतःच्या हाताने पिवळ्या रेशनकार्डवर शिक्के मारताना दिसत असुन जर नागरीक स्वतःच्या हाताने शिक्के मारत आहेत. तर यांच्याकडे शिक्के आलेच कसे आणि जर सर्वसामान्य माणसाकडे शासकीय शिक्के आहेत. तर मग पुरवठा अधिकारी व तहसीलदार करतात. तरी काय ...? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महसूल विभागात अक्षरशः लुट सुरू असुन अनेक शासकीय काम हे काही नेत्यांच्या घरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असुन याला प्रशासकीय यंत्रणा देखील जबाबदार आहेत. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देतील का व या घटनेची चौकशी करतील का ..? असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
No comments:
Post a Comment