Wednesday, January 15, 2025

नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,



नांदगाव (प्रतिनिधी) -   नांदगाव येथील 
 व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी  ए.पी.सोनवणे सर यांनी शालेय परिसरातील झाडांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा तसेच अडकलेल्या पतंग देखील काढल्या. 
मकर संक्रांत या दिवशी अनेक पतंग प्रेमी पतंग उडवत असतात. पतंग उत्सवाचा आनंद लुटत असतात. परंतु त्यावेळेस कापले गेलेले किंवा तुटलेले पतंग हे झाडांमध्ये अडकून बसतात.झाडांमध्ये अडकलेल्या नायलॉन मांजामुळे पक्षांचे पंख छाटले जातात. त्यांच्या जीवाला धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन व्ही. जे .हायस्कूलच्या हरित सेनाप्रमुख,पर्यावरणप्रेमी श ए.पी.सोनवणे सर यांनी हा उपक्रम राबवला.
नायलॉन मांजा हा पक्षी, प्राणी तसेच मानवाला कशाप्रकारे हानिकारक आहे हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
  रस्त्यावर निघताना किंवा सायकल/वाहन चालवताना गळ्यात दुपट्टा किंवा रुमाल बांधूनच प्रवास करावा हे देखील त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितले..


नायलॉन मांजा वापरणार नाही, विद्यार्थांनी घेतली शपथ!!

     - मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही, इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची शपथ विद्यार्थ्यांना हरित सेना प्रमुख श्री सोनवणे सर यांनी ८ जानेवारी रोजी  दिली..
    येथील  सोनवणे सरांच्या या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे  नांदगाव संकुल प्रमुख तथा शालेय समिती अध्यक्ष  संजीव धामणे सर, शाळेचे मुख्याध्यापक  लक्ष्मीकांत ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री खंडू खालकर , पर्यवेक्षक  श्रीवास्तव सर,  मधे सर ,शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी कौतुक केले.

Monday, January 6, 2025

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,



नांदगाव (प्रतिनिधी) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ जानेवारी रोजी नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
      आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती संपुर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरी केली जाते. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ सल्लग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यान येथे जेष्ठ पत्रकार विजय चोपडा यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जेष्ठ पत्रकार विजय चोपडा, तालुका अध्यक्ष संजय मोरे, सरचिटणीस अमिन शेख आणि मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर‌, महात्मा फुले तसेच दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.‌ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार विजय चोपडा, अमिन शेख, संजय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीचे सुनील सोर, डॉ गणेश चव्हाण, शरद आयनोर, सुनील मेंगणार, दिपक भिसे, दिपक बनगर, गणेश सोर यांनी पत्रकारकारांचा सत्कार केला. दरम्यान 
पत्रकार दिनानिमित्त शहरातील सुप्रसिद्ध डॉ. परितोष गुप्ता यांच्या गुप्ता मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विद्यमाने पत्रकारकारांची संपुर्ण आरोग्य तपासणी करण्यात आली. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंचल गंगवाल, अनिल धामणे, सुहास पुणतांबेकर,मोहम्मद शेख, महेश पेवाल, गणेश जाधव, परवेझ शेख, अझर शेख, विजय भावसार, मंगेश सोनस पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन अनिल आव्हाड यांनी केले. आभार चंचल गंगवाल यांनी मानले.

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...