नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगांव शहरातील जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव आणि जायंटस् ग्रुप ऑफ नांदगांव सहेली या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावतानगर येथील शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिष्ठांत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मुला - मुलीनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर सरस्वती देवतेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मुख्याध्यापकांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. जायंटस ग्रुप या सामाजिक संस्थेच्या बाबतीत सविस्तर माहिती देण्यात आली. ग्रुपचे अध्यक्ष सोमनाथ दुसाने व अध्यक्षा सौ. वैशाली दुसाने यांचे शुभ हस्ते पाटी, पेन्सिल इ.साहित्य वाटप करण्यात आले . त्याच बरोबर चॉकलेट व मिठाईचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी आले मनोगत व्यक्त केले. मा.मुख्यधापिकांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले. या कार्यकमास ग्रुपचे अध्यक्ष व अध्यक्षा वैशाली दुसाने, सुमित गुप्ता ,बळवंत शिन्दे ,रामनिवास करवा, भारती बोरसे ,पुष्पा दुसाने, शुकुंतला शिन्दे मुख्याध्यापिका सौ. ज्योतीताई पाटील , दीपिका मोकळ, शाईन शेख, वेदना मोकळ, कल्पना मोकळ व इतर सदस्यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment