Thursday, July 17, 2025

नांदगाव शहरात हरितकुंभ अंतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम,






नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरात देखील नांदगाव नगरपरिषदेच्या वतीने मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. शामकांत जाधव यांच्या उपस्थितीत शहरातील नवीन जलशुद्धीकरण केंद्र जवळील डोंगरावर बांबू, पिंपळ, चिंच, वड, कडुनिंब, शिसम या सारख्या देशी प्रजातीच्या ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.नाशिक जिल्हाधिकारी मा. श्री. जलज शर्मा  यांच्या संकल्पनेतून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात बुधवार पासून दि. १६ जुलै  रोजी " हरितकुंभ "अंतर्गत विशेष वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
    याप्रसंगी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, बचत गटातील महिला, पत्रकार बंधू व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतं. सर्वांच्या मदतीने  वृक्षारोपण उत्साहात पार पडले. तसेच यावेळी सर्व वृक्ष जगविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...