Thursday, July 24, 2025

नांदगाव येथे उबाठा शिवसेनेचा हल्लाबोल रास्ता रोको आंदोलन , नागरी समस्या मांडत प्रशासनाचे वेधलं लक्ष,







नांदगाव (प्रतिनिधी) -  गेल्या अनेक वर्षांपासून
नांदगाव शहरातील नागरिक मूलभूत नागरी समस्यांना सामोरे जात असून, याबाबत अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी देऊनही प्रशासन व शासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने  तालुकप्रमुख संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील जुना रेल्वे गेट भुयारी मार्ग येथून मोर्चा काढत महामार्गावर जाऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  नांदगाव शहरातील तसेच तालुक्यातील अनेक जनसामान्यांच्या समस्या प्रलंबित आहेत. यासाठी अनेकदा लेखी तोंडी तक्रारी करण्यात आल्या . मात्र प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे .प्रशासनाला जाग यावी यासाठी  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तालुका प्रमुख संतोष गुप्ता,  जिल्हा समनव्यक सुनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जुना रेल्वे गेट येथून मोर्चा काढत महामार्ग क्रमांक २४ वर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात सुनील पाटील,  संतोष गुप्ता,  श्रावण आढाव , माधव शेलार,  मुक्तताताई नलवडे,  शैलेश सोनवणे,  निवृत्ती गुंजाळ, सतीश बारावकर, अनिल रिंढे, संतोष वाघ , भाऊसाहेब सदगीर, गोरख जाधव ,सीताराम राठोड ,प्रमोद मोरे ,गौतम जैन, वसंत नागरे, राजाभाऊ आहेर ,दादाभाऊ आहेर, बबन उगले, बाबासाहेब गायके, शिवसेना नेते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आहेत प्रमुख मागण्या - 
▶ गिरणा धरण ५६ खेडी योजनेच्या जलवाहिन्यांमधून होणाऱ्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाया या लिकेजमुळे अंडरपासमध्ये वर्षभर साचलेले पाणी, शेवाळ व ओलावा निर्माण होत असून, नागरिकांना यामुळे गंभीर धोके संभवत आहेत.

- दूषित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम

- लिकेज झाल्यानंतर गढूळ पाणी पुन्हा पाइपलाईनमध्ये ओढले जाते. परिणामी संपूर्ण शहरात अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे.

▶ दुरुस्तीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा

- अंडरपासचा रस्ता रुंद करा हॉटेल नंदिनीजवळील भिंत हटवून अंडरपासचा रस्ता अधिक मोकळा व प्रवाहक्षम करावा.
* महत्वाच्या गाड्यांना नांदगाव व न्यायडोंगरी स्थानकांवर थांबा देण्यात यावा झेलम, शालिमार, सचखंड, सेवाग्राम व बडनेरा एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे पुन्हा बहाल करावेत.

- येवला रोडवर पादचारी पूल उभारण्याची मागणी रेल्वे ट्रॅक ओलांडताना आतापर्यंत अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत.

- उबाठा शिवसेना कार्यालयावर झालेल्या बेकायदेशीर कब्ज्याची चौकशी करा.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....