नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कळवाडी तसेच परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतमालाची नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कळवाडी तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.
सदर परिस्थितीची माहिती मिळताच आमदार सुहास अण्णा कांदे यांनी तात्काळ तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून तातडीने सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या नंतर तहसीलदार तुषार सोनवणे, तसेच कृषी अधिकारी भगवान गोरुडे आणि संबंधित अधिकारी यांनी कळवाडी सह नरडाने, चिंचगव्हाण, साकूर येथील झालेल्या नुसानची पाहणी केली.
यावेळी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदारांना अधिकारी वर्गास दिल्या. या वेळी आमदार प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वर कांदे या पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. या प्रसंगी शेतकरी बांधव तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________
कळवाडी व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसान झाले आहे, तहसीलदार व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत - आमदार सुहास आण्णा कांदे.
No comments:
Post a Comment