नांदगाव (प्रतिनिधी) - फोटो ग्राफी हा एक सर्वच ठिकाणी एक महत्त्वाचा भाग आहे. मग तो कोणताही कार्यक्रम असो. फोटो ग्राफर हा दु:खालाही हसविण्याचे काम करत असतो. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या जीवनातील आहे. मी लहान असताना सायकलवरुन पडलो. पायाला वेदनादायी जखम झाली पण अश्या दुखातही फोटोग्राफर माझा फोटो काढु लागताच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. असे जिल्हा शिवसेना (शिंदे गट) युवा नेते फरहान खान यांनी नांदगाव येथे नांदगाव तालुका फोटो ग्राफर असोसिएशन च्या वर्ल्ड फोटोग्राफी डे सेलिब्रेशन २०२५ च्या गुप्ता लाॅन्स, मालेगाव रोड नांदगाव येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी या संघटनेला त्यांनी यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा.नगराध्यक्ष नांदगाव नगरपरिषदचे अध्यक्ष राजेश कवडे, मार्गदर्शक रोशन ठाकूर,पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, फोटो ग्राफी असोसिएशन चे अध्यक्ष अनिल शिंदे, सागर हिरे,संजय सानप, पत्रकार संजीव निकम, संजीव धामणे, बब्बुभाई शेख, मारुती जगधने, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी फोटोग्राफी ही बातम्या साठी किती महत्वाची आहे व पुर्वी किती महतप्रयासाने बातमी साठी धडपड करावी लागत होती याचे उदाहरण देऊन आज फोटोग्राफी क्षेत्राने फारमोठी प्रगती केली आहे तरीही या क्षेत्रात अपडेट राहाण्याचा सल्ला जेष्ठ पत्रकार संजीव निकम यांनी शुभेच्छा देताना सल्ला दिला. तर हाच धागा पकडून संजीव धामणे यांनी पुर्वी फोटो काढायचा म्हणजे बागुलबुवाच्या घरात जावे लागत असे प्रचंड मेहनत घेऊन फोटो काढला जात असे पण आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या क्षेत्रात प्रगती झाली त्यामुळे बातमी साठी सहज फोटो आता उपलब्ध होत आहेत सर्व फोटो ग्राफर असोसिएशनला यावेळी शुभेच्छा दिल्या व संघटनेमुळे एकीचे बळ निर्माण झाले त्यामुळे अधिक विकास होण्यास मदत होईल असे त्यांनी प्रतिपादन केले. तर यावेळी राजेश कवडे व पत्रकार बब्बुभाई शेख यांनी ही या असोसिएशन शुभेच्छा मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सरोदे यांनी केले. व संघटना स्थापन करण्याचा उद्देश व कार्य काय असेल हे स्पष्ट केले. याप्रसंगी जुना पध्दतीचा कॅमेरा ते आज पर्यंत चे कॅमेरा यांचे प्रदर्शन ही प्रेक्षकांसाठी ठेवण्यात आले होते. या नंतर फोटो ग्राफी बाबत नाशिक येथील रोशन ठाकुर यांचे एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी नांदगाव तालुका फोटो ग्राफर असोसिएशनचे मार्गदर्शक चंचल गंगवाल,विजय भावसार, अध्यक्ष अनिल शिंदे, उपाध्यक्ष मंगेश सोनस, उपाध्यक्ष निलेश बोरसे,सचिव गणेश सरोदे, कार्याध्यक्ष सचिन पांडे, खजिनदार दत्तु आवारे,सहखजिनदार निलेश्वर पाटील, तांत्रिक प्रमुख दिनेश रुणवाल प्रसिद्ध प्रमुख सचिन दंडगव्हाळ व सुहास पुणतांबेकर, शंकर विसपुते, नाना अहिरे व फोटो ग्राफर असोसिएशनचे सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र तुरकुणे यांनी केले तर आभार सचिन पांडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment