नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील स्व. मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिरमध्ये 'महिला सप्तशक्ती संगम मेळावा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान (पश्चिम महाराष्ट्र प्रांत) आणि नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी रुपाली श्रीकांत तुसे होत्या. तसेच प्रमुख व्याख्यात्या म्हणून झोडगेकर उपस्थित होत्या. त्यांनी कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरणाबाबत भारतीय दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन केले. माता पालक संघ उपाध्यक्षा व सदस्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.संस्कृत वंदना कुलथे मिरा कायस्थ यांनी सादर केले.अतिथी परिचय व स्वागत खरोटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बाळासाहेब जाधव यांनी केले. "हम ही मातृशक्ती है" हे गटगीत कुलथे चव्हाण खरोटे पाटील यांनी सादर केले. या गीतास हार्मोनियम साथ मुळे सरांनी केली. व्याख्यान वर आधारित प्रश्नमंजुषा रोकडे बाविस्कर मॅडम यांनी घेतली विजयी महिलांना लगेच बक्षीस दिले. शाळेच्या विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा मध्ये जिजामाता, अहिल्याबाई, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, डॉ.वकील, क्रिकेटीयर, व्योमिका सिंग,आई भूमिका सादरीकरण सुंदरतेने केले. तर मार्गदर्शन शेवरे यांनी केले.विशेष मातांचा सन्मान करण्यात आला. त्यात पोलीस कॉन्स्टेबल घुगे इंगळे तसेच समाज प्रबोधनकार सौ.चव्हाण सौ.दौंड यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी आपले अनुभव कथन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा तुसे यांनी आपले अध्यक्षीय भाषणातून नाविन्यपूर्ण उपक्रमांची वाखणणी केली आभार जयश्री यांनी मानले शाळेच्या मुख्या.सौ. जाधव यांनी प्रतिज्ञा/ संकल्प घेतली सर्व मातांनी प्रतिज्ञा म्हणून संकल्प केला. हळदी कुंकू वाण देऊन कार्यक्रमांची सांगता झाली.सूत्रसंचालन श्रीमती आशा सोनवणे शेवरे यांनी केले.कार्यक्रमांस बालमंदिर सह शाळेतील सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment