नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव मधील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात ७७ वा प्रजासत्ताक दिन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र , न्यू इंग्लिश स्कूल, आदर्श प्रा. शाळा, बाह्यरुग्ण रूग्ण कक्ष नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी प्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत केले . भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. २६ जानेवारी १९५० रोजी म्हणजेच आजच्या दिवशी आपल्या देशाचे संविधान अंमलात आले.
आणि भारत एक ' प्रजासत्ताक राष्ट्र ' बनले. आजचा हा दिवस म्हणजे भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी बलिदान देणारे स्वातंत्र्यसैनिक व सर्व महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.सुरुवातीला आरुषी बोरसे हिने उद्देशिकेचे वाचन केले.कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि ध्वजगीताच्या सुरावलीत तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोपटराव पवार यांच्या हस्ते ' स्काऊट - गाईड ' ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजगीताने मानवंदना देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन ( परेड) सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
उपशिक्षक ज्ञानेश्वर पगार व नरेंद्र पाटील यांनी काॅपीमुक्त परिक्षा व साक्षरता शपथ उपस्थितांना दिली.
याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कवायत सादर केली. तसेच देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. लेझीम पथकाने ढोल- ताशांच्या गजरात कवायत सादर केली. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील , वाळू बागुल, संजय जाधव, जयश्री बोरसे यांनी मार्गदर्शन केलं.
मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि अमित बोरसे -पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
या कार्यक्रमास विजय काकळीज, अनिल पाटील, पोपटराव पवार, सुनील बोरसे, अशोक जाधव, पुंजाराम जाधव, बाळू कदम, आबासाहेब सोमवंशी, अरविंद बोरसे,राजेश पाटील, संजय कदम, दिलीप गोटे, प्रकाश फणसे,एकनाथ तांबे,शिवाजी जाधव, विजय बागूल, अक्षदा कुलकर्णी, डॉ.प्रज्ञा पगार, श्रीमती चौधरी, विलास देशमुख, नंदू आहेर,प्राचार्य हरिश्चंद्र ठाकरे, अविनाश साळुंके, ज्योती काळे,दिपक चव्हाण, अविनाश शेवाळे, उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय भिलोरे व राजेंद्र कदम यांनी केले.
No comments:
Post a Comment