नांदगाव( प्रतिनिधी) - नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नांदगाव तालुक्यात ५३ टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी तालुक्यात चार मतदान केंद्रे होती. दोन हजार ६२२ मतदारांपैकी एक हजार ४०८ पदवीधर मतदारांनी आपला हक्क बजाविला. वेहेळगाव, मनमाड, नांदगाव व जातेगाव या चारपैकी मनमाड केंद्रावर ५७ टक्के नांदगाव केंद्रावर ५२.५६ टक्के, जातेगाव केंद्रावर ५६.७६ टक्के तर वेहेळगाव केंद्रावर ४५ टक्के मतदान झाले. अनेक पदवीधर मतदारांना आपल्या शाळा शासकीय कार्यालयातील जबाबदाऱ्या सांभाळीत मतदानाला येण्यासाठी होणारा विलंब हे त्यापैकी एक प्रमुख कारण ठरले. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, चेतन कुणगर व रामेश्वर गाढे पाटील यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. माजी आमदार अॅड अनिल आहेर, नगराध्यक्ष गणेश धात्रक, विजय पाटील, अनिल पवार, अयुब शेख हे जातेगाव केंद्रावर उपस्थित होते.
Monday, January 30, 2023
Sunday, January 29, 2023
नमन एज्युकेशन संचलित दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी) - नमन एज्युकेशन संचलित लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल
आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल नांदगाव या दोन्ही शाळांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला.दि.२८ जानेवारी रोजी नमन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संजय बागुल संस्थापिका .सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मेडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर आणि रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शालेय प्रांगणात हळदी कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पालक शिक्षक संघाच्या महिला सदस्य ऍडव्होकेट विद्या कसबे ज्योती जंगम लाभल्या होत्या.उपस्थित मान्यवर तसेच शालेय संस्थापक संजय बागुल व संस्थापिका सरिता बागुल लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर , रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांच्याहस्ते सरस्वती पूजन करण्यात आले होते. आणि संस्थापिका बागुल यांच्याहस्ते उपस्थित सर्व मान्यवरांना प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.नमन शिक्षण संस्थेचे संस्थापक बागुल व संस्थापिका मा बागुल लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल मुख्याध्यापिका अनुराधा खांडेकर रेंनबो इंटरनशनल स्कूल मुख्याध्यापिका स्मिता सुर्यवंशी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
महिलांचे मनोरंजन व्हावे यासाठी शाळेने विविध खेळांचे आयोजन केले होते.मकरसंक्रांत हा नववर्षातील पहिला सण असतो आणि त्या सणाचे महत्व व हळदी कुंकू का करतात?याचे महत्व पटवून देण्यात आले.उपस्थित माता पालकाचे हळदी कुमकुम अशा दोन गटात विभाजन करण्यात आले आणि रंगतदार फेऱ्यांना सुरुवात झाली.पहिली फेरी सामान्य ज्ञानाची होती .दुसरी फेरी गाणे ओळखणे आणि तिसरी फेरी अभिनय ओळखणे ही होती.सर्वच फेऱ्या रंगतदार ठरल्या .आणि हळदी गटाने बाजी मारली.विजेता गटाने सरप्राईज गिफ्ट देण्यात आले.
यानंतर मनोरंजन म्हणून काही वेळ अंताक्षरी खेळण्यात आली. महत्वाचा कार्यक्रम म्हणजेच हळदी कुंकू तर सर्वप्रथम सरिता बागुल आणि प्रमुख अतिथी यांना सहशिक्षिका ज्योती सुरसे यांनी हळदी कुंकू आणि तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या. आणि सहशिक्षिका वर्षा नगे आणि मोनाली मोरे यांनी उपस्थित महिलांना हळदी कुंकू आणि तिळगुळ देत शुभेच्छा दिल्या.यानंतर वाण चिठ्ठी निवड पद्धतीने वाण वाटप पुनम सोमासे आणि विजेता पिलके यांनी केले.महिलांनी सरिता बागुल यांनी वाण दिले. आणि उखाण्यांनी ताल धरला.अशा पद्धतीने अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडला.शालेय शिक्षिकांना सरिता बागुल यांनी हळदी कुंकू तसेच तिळगुळ देत सुंदर असे वाण दिले. यानंतर उपस्थित महिलांनी शाळेबद्दल तसेच उपक्रमांबद्दल कौतुक करत अतिशय समर्पक शब्दांत आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित महिलांचे नमन शिक्षण संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले तसेच "तिळगुळ घ्या गोडगोड बोला" म्हणत मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतिशय सुरेख रित्या सहशिक्षिका जयश्री चौधरी यांनी केले. हा कार्यक्रम उत्कृष्ट रीत्या पार पाडण्यासाठी लिटील स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका अर्चना इंगोले अंकिता सरोदे भाग्यश्री शिंदे धनश्री न्याहारकर पूनम सोमासे विजेता पिलके,सुरेखा गायकवाड नेहा पाटील मॅम,ज्योती सुरसे ,वर्षा नगे संदीप पांडे राहुल उपाध्याय सर ,मोहन सुरसे अनिता जगधने क्रिडा शिक्षक मयुरी क्षिरसागर तसेच रेंनबो इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका एडना फर्नांडिस मोनाली गायकवाड जयश्री चौधरी चैताली अहिरे रोहिणी पांडे अश्विनी केदारे ,दिव्या शिंदे तसेच मदतनीस अनिता नेमणार, वैशाली बागुल, ज्योती सोनवणे,मंजुषा जगधने,मंगेश शिंदे, विनोद चौधरी, गजानन पवार,सागर कदम ,बाळू गायकवाड,नासिर खान पठाण,चंदू बागुल ,रवि पटाईत यांनी अतोनात मेहनत घेऊन कार्यक्रम सुंदर रित्या पार पडला.
मोरझरच्या सरपंच लीना पाटील यांना आदर्श महिला कृषी माऊली पुरस्कार प्रदान,
नांदगाव, मोरझर (प्रतिनिधी) - जागतिक कृषी प्रदर्शन २०२३ अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र संचलित कृषी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून मोरझर ता. नांदगाव च्या सरपंच सौ लीना समाधान पाटील यांना आदर्श महिला कृषी माऊली पुरस्कार केंद्राचे प्रमुख दादासाहेब मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मंत्री बबनराव लोणीकर, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडला.
लीना पाटील यांनी मोरझर गावचा कारभार हाती घेतल्यापासून विविध विकास कामांबरोबरच गावगाड्यातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे या उदात्त हेतूने जलसमृद्धी सारखी योजना अमलात आणून पाणी आडवा पाणी जिरवा वर जिल्हाभरात उल्लेखनीय कामकाज केले. त्यामुळे मोरझर गाव दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. शिवार सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर असून सौ पाटील यांचे सामाजिक कामातही विशेष योगदान आहे. गावात सातत्याने आरोग्यविषयक शैक्षणिक व कृषी विषयक कामांमध्ये कामांमध्ये लक्ष ठेवून योग्य कारभार करीत आहेत. यामुळे त्यांना याआधी अनेक संस्थांमार्फत आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नांदगाव विधानसभा मतदार संघात झालेल्या विकास कामांचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर,
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात झालेल्या व सुरू असलेल्या विकास कामांचा अहवाल " बदल घडतोय बदल दिसतोय" या पुस्तकाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याकडे सादर केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्य अहवाल सादर करतांना नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे व युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान यांची उपस्थिती होती.
Saturday, January 28, 2023
नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत पालकमंत्री दादा भुसे यांना निवेदन,
नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव येथे ज्येष्ठ कामगार नेते श्रावण जावळे यांनी आंबेडकर चौक येथे नगरपालिका कर्मचाऱ्यांना धावती भेट दिली. सविस्तर वृत्त असे की दि. २३ जानेवारी रोजी नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा, तसेच अनुकंपा व वारस हक्कांवर नियुक्ती मिळावी, वारस हक्क कंत्राटी कामगारांना वेतन कायदा लागू करावा. मागासवर्गीय सफाई कर्मचारी यांच्यावरील अन्याय दूर करावा यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कामगार मजदुर संघाचे ज्येष्ठ कामगार नेते श्रावण जावळे,मोरे व कार्यकर्ते यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां यांच्या कार्यालयाला पाच ते सात पत्र व्यवहार केलेले आहेत. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने आपण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने स्वतः मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून बैठक आयोजित करावी व पालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडावे आपणास जाणीव व भावना असल्याने मागण्या संदर्भात विनंती केली आहे.नांदगाव, येवला, मलकापूर, सटाणा, यावल, भगुर, या नगरपालिकेत अनुकंप वारस हक्क नोकरी गेल्या काही वर्षापासून देण्यात येत नाही तसेच दिनांक १३/३/२०१६ चे सामाजिक न्याय विधी विभागाचे परिपत्रक रद्द करून सर्व समाजातील सफाई कामगारांना पूर्वीप्रमाणे वारस हक्क चालू करावा व ते पत्रक सुधारित करून किंवा नव्याने पारित करावी अनेक विविध 10 प्रश्नांचे लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे तरी विषयावरील मागण्यासंदर्भात लवकरात लवकर आपले उपस्थितीत मुख्यमंत्री यांच्या दालनात वरील मागण्यांचे तातडीने बैठक लावण्यात यावी अशी निवेदनात विनंती करण्यात आली आहे. नांदगाव नगरपालिकेचे कामगार संघटना,कर्मचारी वृंद यांनी भारतीय मजदूर कामगार संघटनेचे जेष्ठ नेते श्रावण जावळे यांचे नांदगाव नगरीत येताचं आंबेडकर चौक येथे जोरदार स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रावण जावळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन केले व कामगार यांनी महापुरुषांच्या नावाने घोषणा दिल्या होत्या. जावळे यांनी लवकरच कामगारांच्या विविध समस्यांचे कामे मार्गे लागतील आपल्या विविध समस्या मांडणार असल्याचे दादा भुसे यांनी सकारात्मक उत्तर दिलेले आहे असे जमलेल्या कामगारांना जावळे यांनी नांदगाव येथे आंबेडकर चौक येथे बोलताना सांगितले आहे. यावेळी रिपाईचे नेते देविदास मोरे, राजेंद्र गुढेकर, भीमशक्तीचे सोनू पेवाल, गणेश शर्मा,उमेश चंडाले,बापू भालेकर,किरण फुलारे, रितिक पेवाल, नगर नगरपालिका कर्मचारी वृंद,तसेच रिपाई कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था पदाधिकारी मोठ्याा संख्येने उपस्थित होते.
मनमाडच्या मुश्ताक शेखने पटकावला नाशिक श्री मास्टर किताब....!
मनमाड(विशेष प्रतिनिधी) - नाशिक जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने हबीब क्लब यांच्या तर्फे भरविण्यात आलेल्या नाशिक श्री मास्टर या जिल्हा स्तरीय स्पर्धेत मनमाडच्या मुश्ताक शेखने अजिंक्यपद पटकावले असुन तब्बल एक तपांनंतर नाशिक श्री हा किताब मनमाडला मुश्ताकच्या रुपांने मिळाला आहे.या कामगिरी बद्दल मुश्ताकचे मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे.
नाशिक जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन व हबीब क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत मास्टर श्री हा जिल्हास्तरीय किताब मुस्ताक शेख या मनमाडच्या 44 वर्षीय युवकांनी पटकावला असून भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या मुस्ताकने याआधी देखील मोठ्या मेहनतीने अनेक किताब मिळविले आहेत दिवसभर सरकारी कार्यालयात कर्मचारी म्हणून काम केल्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्या शरीराला वेळ देऊन व्यायाम करत मोठ्या मेहनतीने मुस्ताकने आपले शरीर बनविलेले आहे. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात तसेच इतर राज्यात देखील मुस्ताकने अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये यश मिळविलेले आहे. नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मास्टर श्री या किताबासाठी जवळपास 18 स्पर्धक सहभागी झाले होते . या सर्वांना मागे सोडत मुस्ताकने यश संपादन केले व तब्बल एक तपानंतर म्हणजे बारा वर्षानंतर नाशिक जिल्हा श्री हा किताब पुन्हा एकदा मनमाड चे नावे केला आहे. या कामगिरीबद्दल मनमाड शहरातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक यासह इतर सर्व थरातून मुस्ताकचे अभिनंदन करण्यात येत आहे. याही पुढे मेहनत सुरूच ठेवून राज्यस्तरावर खेळण्यासाठी तसेच इतर तरुणांना बॉडी बिल्डिंग कडे आकर्षित करून त्यांना देखील स्पर्धेसाठी तयार करणारा त्याचे मत मुस्ताक शेख यांनी व्यक्त केले आहे.
Friday, January 27, 2023
राज्यस्तरीय वुशु स्पर्धेत नांदगाव महाविदयालयाचे यश,
माधुरी भाऊसाहेब ठोंबरे वुशु स्पर्धेत राज्यात तृतीय व वैष्णवी किशोर चितळकर बॉक्सिंग राज्यस्तरीय सहभाग,
नांदगाव ( प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड व क्रीडा परीषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय वुशु क्रीडा स्पर्धा मध्ये नांदगाव महाविदयालयातील इयत्ता १२ वी विज्ञान वर्गाची विदयार्थिनी राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाने विजयी झाली. कु. माधुरी भाऊसाहेब ठोंबरे हीचा सत्कार करतांना महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे व सर्व स्टाफ तसेच राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा संकूल पालघर येथे संपन्न झाल्या हया स्पर्धेत कु. वैष्णवी किशोर चितळकर हीने सहभाग नोंदवुन उत्तम कामगीरी केली. या यशाबद्दल म. वि. प्र. संचालक (नांदगाव) अमितभाऊ बोरसे यांनी विदयार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे दोन्ही विदयार्थिनींचे सत्कार करुन पुढील खेळाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या . तसेच ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षकांनी विदयार्थिनीचे हार्दिक अभिनंदन केले.
वरील दोन्ही विदयार्थिनीस तंत्र व कौशल्याचे मार्गदर्शन महाविदयालयाचे उपप्राचार्य (ज्यु. कॉलेज) डी. एम. राठोड, सिनीअर महाविदयालयाचे क्रीडासंचालक आर. डी. वडजे सर व दिलीप आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.
Subscribe to:
Posts (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे माघारीनंतर युतीचं ...