Friday, November 26, 2021

स्थांनिकाना गिरणा धरणाचा मच्छिमार ठेका देण्याची मागणी


नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - गिरणा धरणा च्या मच्छिमार  बेकायदेशीर ठेक्या विरोधात नादगाव मध्ये गुरुवारी ( दि.२५) ला  तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.   बेकायदेशीर ठेका रद्द करण्यात यावा,  शासनाची फसवणुक करणार्या ठेकेदारावर विरोधात  कारवाई करण्यात यावी, आदिवासी मच्छिमारावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत, या अनेक मागण्यासाठी प्रहार संघटनेतर्फे तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

  यावेळी प्रहार संघटनेतर्फे जोरदार घोषणा देण्यात आल्या.  विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. निवेदनात गिरणा धरणाचा  कंपनीच्या नावाने ठेका घेतला तो मी. ब्रिज कंपनीनुसार कायद्यानुसार स्थापन झाली नाही.

         गिरणा धरणावरील ठेकेदाराने  मच्छिमारांचे मासे पकडण्याचे जाळे  फाडल्याने आदिवासी बांधवानवर ऊपासमारीची वेळ आली असुन आदिवासी बांधवांना एक वेळचे चुल पेटवणे ही कठीण  झाले आहे . कारण गिरणा धरणावरील आदिवासीनकडे मासेमारी सोडुन दुसरा कोणताही व्ययसाय नसुन ना शेती ना स्वताचे घरदार पहिलेच कोरोना महामारीमुळे बेरोजगारी वाढली आहे.  अशातच आदिवासींचे पोट भरण्याचे साधन होते तेही ह्या ठेकेदाराने हिरावुन घेतले आहे.  आदिवासींनी आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे आदिवांसीचे जाळे फाडुन फेकुन देणे असा प्रकार ठेकेदारा कडुन सुरू आहे तसेच बेकायदेशीर ठेक्याच्या विरोधात आंदोलन करणार्या आदिवासी विरोधात खोट मारहाणीचे गुन्हे दाखल केले जात आहेत. गिरणाधरणावरील ठेकेदार हा पोलीस प्रशासनाला खोटी माहीती देऊन बेकायदेशीर ठेक्या विरोधात आंदोलन करणार्या मच्छिमारांवार मारहाणीचे खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासनाची दिशाभुल करत आहे . याच कारणास्तव मालेगाव तालुक्यातील आदिवासी बांधवानमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन, गावा गावातील शांतता भंग होत आहे .आणि कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे . तसेच ऊपासमारीची वेळ आली असतांना आदिवासींनी आपल्या घरावर काळे झेंडे लावुन काळी दिवाळी साजरी केली वर्षातुन एकदा येणारा दिवाळी सारखा सणही आदिवासींना साजरा करता आला नाही. तरी अशा मुजोर व गुंड प्रवृत्तीच्या ठेकेदारावर ठाकरे सरकार कारवाई करेल का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. या मोर्चात शेखर पगार , संदीप सुर्यवंशी, बाबाजी पवार,  संजय शिवडे, भुरा जावरे , योगेश गर्दे, उमेश पाटील, बापु कोळी, शांताराम नाईक ईत्यादी गिरणा धरण प्रकल्पग्रस्त व स्थानिक मच्छिमार  सहभागी झाले




No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...