मोटारी दुरुस्त केल्याने मनमाडचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होणार
मनमाड( प्रतिनिधी- परवेज शेख ) - वाघदर्डी धरणाच्या जलशुध्दीकेंद्रावर तीनही मोटारी बसवल्याने बंद झालेला पाणी पुरवठा पुन्हा सुरू होणार आहे. मनमाड शहरातील पाणीपुरवठा सुरु झाल्याने नांगरिकांना दिलासा मिळाला आहे . शहराला आता सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांनी दिली.
जलशुध्दीकरणाच्या तीनपैकी दोन मोटारी जळाल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. ईथील नांगरिकांना पाणी १५ ते १८ दिवसांनी पाणी येत होते, यांवर नांगरिकांनी संताप व्यक्त केला. शहराला महिन्यातून चारवेळा पाणी पुरवठा होणार, आठवड्यातून एकदा पाणी मिळेल . वाघदर्डी धरण तिसरे वर्षीही भरलेले असून तरी नांगरिकांना पंधरा दिवसानंतर पाणी पुरवठा सुरु होता. मोटारी दुरूस्त केल्याने पाणी पुरवठा सातदिवसाआड करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याने शिवसेना गटनेते गणेश धात्रक यांनी सांगितले. यावेळी माजी आ.जगन्नाथ धात्रक, नगरसेवक महेंद्र सिरसाट, पिंटु कटारे, सनी फसाटे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्तार शेख व ईतर कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment