स्वच्छता सर्वेक्षणासाठी स्थान मिळालं त्यासाठी जागरुक नागरिक
कर्मचारी विविध भागात जाऊन नांगरिकांना कचरा गाडीत टाकायला ध्वनिनिक्षेपक द्वारे सांगतात.
नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगाव नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात ५२ वा स्थान पटकावले . केंद्रीय नगरविकास व गृहनिर्माण मंत्रालयाने जाहिर केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण - २०२१ च्या निकालात नांदगाव शहराने भारतातील संपुर्ण पश्चिम क्षेत्रात ५७७ शहरांमधे ५२ स्थान मिळण्यात यश आले. शहराला कचरामुक्त मानांकनात एक स्टार मिळालं. नगरपालिकेचे मुख्यधिकारी विजय धांडे यांनी सांगितलं की, नांदगावकरांच्या सहकार्याने अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तराचे वरचे स्थान प्राप्त करू शकते.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने देशभरात स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविली होती. यात जानेवारी ते ३१ मार्च २०२१ दरम्यान भारतामधे सर्व शहराचा समाविष्ठ करण्यात आला होता. विविध शहराचे स्वच्छतेच्या स्थितीचे मुल्यांकन करण्यात आले. देशातील स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी ४३२० शहरांचा सहभागी झाले होते. शहरांची निवड करताना स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत सर्वात स्वच्छ शहरासाठी रेंटीग स्टार दिले गेले. दिल्लीमध्ये शनिवारी ( दि.२०) विज्ञान भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या तर्फे स्वच्छ शहरासाठी स्वच्छ सर्वेक्षण पूरस्कार देण्यात आली.
No comments:
Post a Comment