नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे माघारीनंतर युतीचं उमेदवार शिवसेना पक्षाचे सागर हिरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश बनकर यांच्या मध्ये थेट नगराध्यक्ष पदासाठी लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून संतोष गुप्ता शिवसेना (उबाठा), संजय सानप भाजपा, धिरज मोकळ अपक्ष यांनी माघार घेतली आहे. नगरपरिषदेच्या इतिहासात सात नगरसेवक बिनविरोध करत आमदार सुहास कांदे यांनी आपला करिष्मा दाखवला आहे.
नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिदेसेनेचे
प्रभाग- २ ब स्वाती अमोल नांवदर प्रभाग- ४ ब शोभा नेमीचंद कासलीवाल प्रभाग - ४अ योगेता सचिन खरोटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शुक्रवार (दि.२१) रोजी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, थेट नगराध्यक्ष पदासाठी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ सामना होणार आहे. तर अनेक प्रभागात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच दुरंगी लढती होणार आहे. महाविकास आघाडीचे अस्तित्व दिसून येत नाही. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या निवडणुकीत शिवसेना पक्षाने नगरपरिषदेच्या वीस जागांपैकी सात जागा बिनविरोध निवडून आणता मजबूत आघाडी घेतली असून विरोधकांची भंबेरी उडवली आहे. पण नांदगावमध्ये मागच्या काही दिवसात राजकीय घडामोडी घडल्या होत्या. अनेक मोठं चेहरे निवडणूकीतून माघार घेतली.
नांदगाव मध्ये मतदान असून निवडणूक शहरात आहे की नाही मतदार ही वैतागले आहेत. याचा परिणाम मतांवर होऊ शकतो. अशा गुप्त मतदानाचा फटका निश्चित बसणार आहे. नांदगाव नगरीत प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले माजी नगराध्यक्ष राजेश बनकर यापूर्वी नगराध्यक्ष पदांवर राहिले आहे. आणि तेव्हा निवडणूकीत ते किंगमेकर ठरलं होतं. ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. कारण नगरपरिषदेत बहुमत सोबत नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे. जे नाराज अशा नेत्यांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहेत. भुजबळांनी नांदगावच्या निवडणूकी कडे लक्ष दिले आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव, मनमाडला विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राजकारणाचे चाणक्य म्हणून त्यांच्या कडे बघितले जाते. या नाराजीचा फायदा उचलण्याचे प्रयत्न ते करतील. मागच्या काही दिवसात शहरात विविध राजकीय घडामोडी घडल्या त्यांचा राग मतदारांमध्ये आहे. माघारीनंतर आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, शिवसेनेच्या झंझावातापुढे विरोधक कितपत तग धरत असलं तरी मतदार राजा मत कोणाला देतात हे सांगणं कठीण आहे. ही निवडणूक वाटेल तशी सोपी नाही. पुढील महिन्यात दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून, तीन तारखेला मतमोजणी होणार आहे.
No comments:
Post a Comment