Saturday, December 4, 2021

मनमाड मध्ये पसरली दाट धुक्याची चादर, रेल्वे वाहतूक धीम्या गतीने

 मनमाड मध्ये पसरली दाट धुक्याची चादर, रेल्वे वाहतूक धीम्या गतीने 

मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - मनमाड शहरात सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरल्याने रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. जम्मू काश्मीर, महाबळेश्वर ईथे जसे दाट धुका असतो तसाच काहीसा मनमाड सह आसपास च्या परिसरात दिसून आला. रस्त्यावरून जाणार्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. चालकाना  वाहनांचे हेड लाईट चालू ठेवून धीम्या गतिने वाहन चालविणे भाग पडले. रेल्वे सेवेवर यांचा परिणाम झाल्याने वेळापत्रक  कोलमडले. भारतातून मुंबई कडे  येणार्या गाड्या उशिराने धावत होत्या.   रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या मुळे प्रवासांचे हाल झाले. सलग चार पाच दिवसात पाऊस, त्यात दाट धुका , शेतीपिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. सलग‌ पडलेल्या पाऊसाने रब्बी पिक गहु, मका, कांदे, व फळबागावर मोठा फटका बसेल या चितेंत बळीराजा आहे . पिके पाऊसात भिजल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागेल . 

         मनमाडसह ग्रामिण भागात धूक्यामूळे वाहने धीम्या गतिने चालत होती. रस्त्यावरून वाहन चालवताना समोरील येणार्या गाड्या दिसाव्यात यासाठी हेड लाईट चालू करण्याची चालकावर आली होती. पाऊसा सोबत थंडी असल्याने लोकांनी स्वेटर , कानटोपा, मफलर घालून घराबाहेर निघाले. या थंडीमुळे तापमानाचा पारा घसरत चालला आहे. दाट धुक्याची चादर पसरल्यामुळे  रेल्वे सिग्नल बरोबर दिसत नसल्याने भारतातून मुंबई कडे येणार्या गाड्या धीम्या गतीने धावत होत्या. 

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...