Friday, December 3, 2021

अवकाळी पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान

 अवकाळी पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान



मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - तालुक्यात ढगाळ वातावरण , २४ तासापासून जास्त वेळ सुरू झालेला पाऊसाने शेतकर्याच्या हातातोडांशी  आलेल्या पिकांचे नुकसान केले.  अवकाळी पाऊसाने रब्बी पिकांचे जास्त नुकसान केल्याने कांदे, गहु, मका, हरभरा सोबतच फळबागांवर नुकसान झालेले आहे. सरकारने शेतकर्याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. याआधी पाऊसाच्या महिन्यात अतिपाऊसामूळे  शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकरी कधी अस्मानी- सुल्तानी संकटात सापडलेला असुन,  यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बी पिकांचे चांगले उत्पादन निघेल अशी आशा होती, पण सलग चार दिवसाच्या पाऊसाने व बदलेला हवामाना मुळे काढून टाकलेला कांदा, मका ओला झाल्याने प्रचंड नूकसान झाले. तसेच कांद्याचे उळे, हरभरा, गहू व द्राक्षबाग मोठ्या प्रमाणावर फटका बसला. चाळीत ठेवलेला कांदा ओला झाल्याने त्याला कोंब येण्यास सुरूवात झालेली आहे . यामुळे शेतकरी वर्गाला जास्त आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. रब्बी पिकांपासून उत्पन्न मिळेल अशी आशा होती पण अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.



No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...