स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वकील दिन साजरा
नांदगांव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - देशातील न्यायदानाच्या प्रकियेत वकिलाची भुमिका क़ायम महत्वाची ठरलेली आहे. वकिलाला पंडित संबोधले जाते असे प्रतिपादन न्यायाधीश शरदजी दुबाले यांनी मनोगत व्यक्त केले. घटना समितिचे पहिले अध्यक्ष डॉ राजेन्द्र प्रसाद यांच्या जन्म दिनानिमित देशात वकिल दिन साजरा करण्यात येतो, त्याचे औचित्य सांधुन नांदगांव शहरातील प्रथमच श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्था/स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संस्थेच्या वतीने नांदगांव कोर्टातील दालनात वकिल दिन मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या वतीने सर्व वकिलाचा सत्कार करण्यात आला. यावेऴी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानीय ज्येष्ठ विधितज्ञ जयकुमार कासलीवाल हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगांव न्यायलयाचे न्यायधीश शरद दुबाले स्व सरस्वती इच्छाराम धामणे महिला बहुदेशीय संस्थेच्या उपाध्यक्षा सुशिला पारख , प्रतिष्ठित व्यापारी शामभाऊ पारख , अनिल करवा, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रंगनाथ चव्हाण, रमाकांत सोनवणे उपस्थित होते. वकिल संघाचे अध्यक्ष अॅड गजानन सुरसे यांनी स्वागत केले. नांदगांव न्यायलयाचे अॅड अमोल आहेर, अॅड आहेर , अॅड युनिस शेख, अॅड महेश पाटिल, अॅड कासलीवाल, अॅड दराडे, अॅड अनिल शिंदे, अॅड जयेश पाटिल, अॅड बिंन्नर ,अॅड सोरंभ कासलीवाल, अॅड सरोदे, अॅड घुगे , अॅड सचिन साऴवे, यांनी सुत्रसंचालन केले तर सस्थेच्या वतीने आभार अनिल धामणे यांनी मानले.
No comments:
Post a Comment