सर्पमित्र विजय बडोदेने दुर्मिळ पांढऱ्या डोळ्यांचा बाज पक्ष्याला दिले जीवदान
नांदगांव ( महेश पेवाल ) - नांदगाव पोलिस स्टेशन जवळील वड चिंच चे झाड असून, झाडावर काही कावळ्यांनी एका पक्षी वर हल्ला केला आणि तो जखमी अवस्थेत खाली पडला. जवळील गुप्ता झेरॉक्स मनीष गुप्ता यांच्या नजरेत येतातच त्यांनी ताबडतोब पक्ष्याला ताब्यात घेतले पक्षाचा जीव वाचवावा म्हणून सर्पमित्र विजय बडोदे यांना फोन वरून कळवले. बडोदे वेळेवर पोहोचले आणि हा पक्षी ताब्यात घेऊन थोडक्यात माहिती दिली, " हा पांढऱ्या डोळ्याचा बाज दुर्मिळ पक्षी आहे याला इंग्लिश मध्ये White-eyed Buzzard असे म्हणतात.
पांढऱ्या डोळ्याचा बाज हा पक्षी साधारणपणे डोमकावळ्याएवढा असून त्याची लांबी सुमारे ४५ सेमी. असते. पाठीचा रंग तपकिरी असून नर आणि मादी दिसण्यात सारखीच असतात. हे पक्षी झुडपे असलेल्या खुल्या प्रदेशात व लागवडीखाली असलेल्या शेतांमध्ये हा राहतो. डोंगर आणि दमट व दाट अरण्यात राहणे त्याला आवडत नाही. हे पक्षी एकेकटेच असतात. हा हिंस्र पक्षी असूनदेखील स्वभावाने सुस्त आहे. वठलेली झाडे, तारायंत्राचे खांब इ. ठिकाणी हा बसलेला असतो आणि तेथूनच भक्ष्यावर झडप घालतो. उंदीर, सरडे, बेडूक, टोळ, नाकतोडे आणि इतर मोठे कीटक याचे भक्ष्य होतात.
पांढऱ्या डोळ्याचा बाज या पक्ष्यांच्या प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून मेपर्यंत असतो. नर व मादी काटक्याकुटक्या आणून गर्द पालवी असलेल्या एखाद्या झाडाच्या फांदीच्या दुबेळक्यात कावळ्याच्या घरट्यासारखे एक ओबडधोबड घरटे बांधतात. मादी त्यात तीन अंडी घालते, त्यांचा रंग हिरवट पांढरा असतो. उबविते, पण पिल्लांचे संगोपन दोघेही करतात,
अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी देऊन पशुवैद्यकीय डॉ. एन ताठे , कर्मचारी शेळके अण्णा पवार, यांनी उपचार करून आणि वनविभागाच्या स्वाधीन करून पक्षाला जीवदान दिले.
No comments:
Post a Comment