Wednesday, January 5, 2022

नांदगांवमधील शिवस्मारकांसाठी आ.सुहास कांदे कडुन २० लाखांचा निधी मंजुर

नांदगांवमधील शिवस्मारकांसाठी आ.सुहास कांदे कडुन २० लाखांचा निधी मंजुर 

नांदगांव ( महेश पेवाल ) - नांदगांव मधील शिवस्फुर्ती मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन शिवस्मारकांसाठी शिवभक्त संगिता सोनवणे यांनी सोमवारी ( दि.३ ) ला उपोषण केले. तालुक्याचे आमदार सुहास कांदेनी तात्काळ उपोषण स्थळी भेट दिली. संगिता सोनवणे यांनी केलेली मागणी आ.कांदेनी नवीन शिवस्मारकासाठी  तब्बल वीस लाखांचा निधी मंजुर केला. 
      संगिता सोनवणे हे दररोज येथे साफसफाई, स्वच्छता करून सामाजिक कार्य करत असतात. शिव स्मारकांसाठी मंगळसूत्र दागिने मोडुन खर्च करण्यासाठी पुढाकार दर्शवला होता. काही दिवसापूर्वी सोनवणे यांनी पत्राद्वारे मी दि. ३ ला उपोषणास बसणार आहे, यांची माहिती मिळताच आ.सुहास कांदे हे शहरातील शिवस्फुर्ती मैदानावरील संगिता सोनवणे उपोषणात बसलेल्या ठिकाणी पोहचले. यावेळी नवीन शिवस्मारकासाठी प्रशासकीय पातळीवर  तातडीने २० लाख रुपये निधी मंजूर करत दुरुस्ती मार्ग मोकळा करून दिला. या उपोषणाला संगिता सोनवणे, अखिल भारतीय मराठा महासंघ, फुले, शाहु, आंबेडकर समितीसोबत नांदगांव तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजासह नांगरिक  उपस्थित राहिले. यावेळी  आ.कांदेनी संवाद साधत, आपण यापूढे कोणते पण स्मारकांचे दुरुस्ती , नुतनीकरणाचे काम आजपासून हाती घेत असल्याचे जाहिर केले. उपोषणात भास्कर झाल्टे, भीमराज लोखंडे,  विशाल वडघुले, बाळासाहेब कवडे, नगराध्यक्ष राजेश कवडे, मुस्लीम आरक्षण समितीचे शेख, मुख्याधिकारी विवेक धांडे, पोलीस निरिक्षक गाढे साहेब, गुलाब भाबड, किरण देवरे, राजाभाऊ देशमुख, सुनील जाधव, सागर हिरे,  भावराव बागुल, आदीसह मराठा समाज व नांगरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...