Tuesday, January 11, 2022

नांदगावचे प्रसाद सोनवणे यांची नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कांग्रेस उपाध्यक्षपदी निवड

 नांदगांव ( परवेज शेख ) -  नांदगाव  तालुक्यातील प्रसाद सोनवणे यांची नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्षपदी  निवड करण्यात आली. नाशिक येथे सोनवणे यांना निवडीचे पत्र पालकमंत्री छगन  भुजबळ यांचे हस्ते देण्यात आले.
       नांदगाव नाशिकमधील  प्रसाद सोनवणेंनी  विद्यार्थ्यांची मजबूत फळी तयार करत तत्कालीन फडणवीस सरकार विरोधात, अनेक विद्यार्थीहित लढे दिले. यात प्रमुख्याने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती समस्या, राज्यव्यापी कॉपीमुक्त अभियान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विरोधी अनेक लढे उभारले. कुलगुरु डॉ. करमाळकरांची भेट घेत, लढे यशस्वीही केले. या सर्व लढ्यांच्या, अंदोलनांच्या धर्तीवर सोनवणेंनी Nationalist of the year या दिल्लीत होणार्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या  कार्यक्रमातही नाशिक जिल्ह्याचे नेतृत्त्व केले. यावेळी तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस व आत्ताचे राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कांग्रेस  धिरज शर्मा यांची भेट घेत युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. "प्रसादभैया सोनवणे प्रतिष्ठानची" स्थापनाही सोनवणेंनी केली.
     कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अनेक गरजूंना मदत झाली, त्यावेळी प्रसादभैय्या प्रतिष्ठाणनेही नांदगावमध्ये जवळजवळ 3-4 महीने गरजूंना मोफत अन्नाचे वाटप केले. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री  छगन भुजबळ च्या व समिर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमीत्त नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी जिल्हापरीषद गटात महिलांचा कार्यक्रम आयोजीत करत 100 बचत गट स्थापनेचा निर्धारही केला.
       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व समता परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दिलीपआण्णा खैरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे नाशिक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी कडलग , समता परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक व समता परिषदेचे प्रदेश प्रचारक डॉ .नागेश गवळी उपस्थित होते.
    

No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...