नांदगाव ( महेश पेवाल ) - सद्या सर्वीकडे पतंग उत्सव चालू असल्याने जसजसा मकरसक्रांत सण जवळ येतोय तसा नांदगांव शहरात सह ग्रामीण भागात पतंग उडविण्यास सज्ज झाले आहे. पतंग बरोबर आसरी ला मागणी दिसून येतंय. शहरातील विविध दुकानात पतंग लहान, मोठी, तिरकस अशा पतंगीना मोठी मागणी आहे. नांदगाव नगरपरिषदेला नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश आलेले आहे. त्यात सर्व नांगरिकाना सुचना दिली आहे की प्लास्टीक अथवा कृत्रीम वसतूंचा वापर करुन बनविण्यात आलेल्या व सर्वसाधारण नायलॉन मांजा या नावाने परिचीत धाग्यामुळे पक्षी व मानव जीवितेस इजा पोहचते, काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. त्यामुळे पतंग उडविण्यास नायलॉन मांजा , धाग्यामुळे होणाऱ्या प्राणघातक इजापासून पक्षी व मानव जीवितेस संरक्षण करण्यासाठी गरज आहे.
मांजाचे तुकडे जमिनीवर पडते, मांजा नायलॉनचा असल्याने त्याचे विघटन होत नाही. गटारी , नदी नाल्यासारख्या नैसर्गिक प्रवाहात अडथळे निर्माण होत असतात. गायीना तत्सम प्राण्यांना खाद्यामध्ये मांजाचे तुकडे सेवन केल्यास त्यांना गुदमरण्याचा त्रास होतो. प्लास्टिकच्या धांग्याना अति वापर विजेच्या तारांवरील घर्षणामुळे होणाऱ्या ठिणग्यांनी आग लागून वीजप्रवाह खंडित होतात, वीजकेंद्र बंद होते. वन्य जीवांना जीवितहानी पोहोचण्याचा संभव असतो.
नांदगांव नगरपालिकेला नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडून आदेश दिलेले की , पर्यावरण ( संरक्षण) कायदा १९८६ च्या कलम ५ अन्वये , प्लास्टिक किंवा इतर कृत्रीम वस्तूपासून बनवलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचीत असलेल्या पक्क्या धांग्याचा वापर पतंग उडविण्याच्या मकरसंक्रांत सणाच्या वेळी तसेच इतर वेळी करण्यास त्याप्रमाणे नायलॉन मांज्याची निमिर्ती, विक्री , साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात येत आहे. जिल्ह्यातील घाऊक, व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री , साठवणूकीस प्रतिबंध करण्यात आले आहे. या आदेशांचे अनुपालन करण्यास कसूर केल्यास संबंधित व्यक्ती , संस्था या पर्यावरण ( संरक्षण) कायदा , १९८६ चे कलम १५ मध्ये नमूद शास्तीस पात्र होतील .
No comments:
Post a Comment