Thursday, January 13, 2022

नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

नांदगाव  येथे नगरपालिकेच्या सभागृहात पत्रकादिनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विचार मांडताना जेष्ठ पत्रकार संजीव धामणे व नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी
छाया :- सुहास पुंतांबेकर


नांदगाव ( महेश पेवाल ) - स्वातंत्र्य चळवळीत राजकीय भान निर्माण करणारी,अनेक सामाजिक बदलांसाठी आग्रही राहणारी ते आताची २४ बाय ७ पत्रकारिता…पेन ते काँप्युटर,ते डिजिटल प्रिंटिंग,मुद्रित माध्यमं,टीव्ही चॅनेल्स ते हातातल्या मोबाईलवर वेळोवेळी येणारे अपडेट्सस देणारी पत्रकारिता बदलत राहिली आहे.पत्रकार हा एखाद्या घटनेबद्दल भाष्य करतो तर वार्ताहर वार्ता गोळा करण्याचे काम करतो.पत्रकारितेचं स्वरुप बदलत असले तरी पत्रकारितेतली मूळ मूल्यं कायम आहे पत्रकार दिनी जेष्ठ पत्रकार संजीव धामणे यांनी व्यक्त केले.
   नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ [रजि.] संलग्न नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने नांदगाव येथे नगरपालिकेच्या सभागृहात दर्पण'या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर'यांचा जन्मदिवस(६.जानेवारी गुरुवारी)पत्रकार दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार विजय चोपडा होते.सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ पत्रकार विजय चोपडा,संघाचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार संजीव धामणे,माजी तालुकाध्यक्ष बब्बूभाई शेख,तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम,सचिव अमीनभाई शेख यांनी केले.जनश्रध्दाच्या संपादिका श्रीमती शकुंतला गुजराथी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.अध्यक्षस्थानीय भाषणात जेष्ठ पत्रकार विजय चोपडा आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले कि ज्या जेष्ठ पत्रकारांनी आपले आयुष्य पत्रकारिता खर्ची केले ते आता कोणत्याही वृत्तपत्रात काम करत नाही.पत्रकार संघाने त्यांना आपल्या संघात मानद सदस्य म्हणून घ्यावे आम्हाला आपल्यासोबत काम करण्यास आनंद वाटेल,पत्रकार हा कधी सेवानिवृत्त होत नाही.यावेळी जेष्ठ जेष्ठ पत्रकार संजीव धामणे,संघाचे माजी तालुकाध्यक्ष बब्बुभाई शेख,विद्यमान तालुका अध्यक्ष बाबासाहेब कदम उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव यांनी भावना व्यक्त केल्या संघाचे सचिव अमीनभाई शेख यांनी सूत्रसंचालन व आभार मानले यावेळीजेष्ठ पत्रकार संजीव धामणे,पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक संजीव निकम,विजय चोपडा माजी तालुका अध्यक्ष बब्बूभाई शेख,विद्यमान तालुकाध्यक्ष,बाबासाहेब कदम,सचिव,आमीन भाई शेख कार्याध्यक्ष,गिरीश जोशी,उपाध्यक्ष चंद्रकांत भालेराव,गणेश आहेर,भगवान हिरे,अमोल बनसोडे,मोहम्मद शेख,रईस भाई शेख अजय सोनवणे,किरण डोंगरे,सुहास पुतांबेकर, सचिन गायकवाड, महेश पेवाल, आजहर शेख परवेज शेख,पंकज वाले, विशाल पवार,विकास अहिरे,भारत देवरे आदी पत्रकार उपस्थित होते.





No comments:

Post a Comment

न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...