नांदगाव (महेश पेवाल ) - देशातील नेपाळ सीमेवर बिरपुर येथे कार्यरत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील जवान अपघातात शहीद झाले . बोलठाण येथील सुपुत्र अमोल हिम्मतराव पाटील वय वर्षे ३० या जवानाला नेपाळ सीमेवर कार्यरत असताना ११ हजार के. व्ही. विजेच्या तारेच्या धक्क्याने अपघाती निधन झाले. अमोल हिम्मतराव पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच बोलठाण आणि बोलठाण घाटमाथा परिसर , नांदगाव तालुक्यात संक्रांतीचा गोडवा शोक सागरात बुडाला आहे. सशस्त्र सीमा बल नेपाळ जवळील बिरपुर कार्यरत असलेला अमोल पाटील हे सहकाऱ्या सोबत सीमेवर तैनात होते. त्याच वेळी सुरू असलेल्या कामात विजेच्या धक्क्याने अमोल पाटील यांना वीर मरण आले. या अपघातात अन्य दोन जणांना देखील वीरमरण आल्याचे समजते. जिद्द आणि चिकाटीमुळे अमोल यांची गेल्या सहा वर्षापासून सशस्त्र सीमा बाला मध्ये निवड झाली होती. शहीद अमोल पाटील हे २०१५ मध्ये सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियनमध्ये आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. नुकत्याच दिवाळी सणात अमोल पाटील हे बोलठाण येथे सुटीवर आले होते. कर्तव्यावर परत जाताना, आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्याची चिमुकलीला सोबत घेऊन गेले होते.
दरम्यान बिरपूर सीमेवर त्यांना वीर मरण आले ची माहिती बोलठाण येथे असणाऱ्या लहान भावाला मिळाली आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोल पाटील यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी,आई, आणि अविवाहित भाऊ असा परिवार आहे. शहिद जवान अमोल पाटील यांचे पार्थिव शरीर बोलठाण येथे आणण्यात येणार असुन केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांचे पालन करून शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नांदगाव तालुक्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment