Friday, January 7, 2022

सोमवारपासून नांदगाव, मनमाड ला मेमू एक्सप्रेस धावणार


नांदगांव/ मनमाड ( परवेज शेख ) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च २०२० पासून भुसावळ-देवळाली पेंसेजर बंद करण्यात आली. यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्यांना प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, आता पॅसेंजर ऐवजी मेमू एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय भुसावळ  रेल्वे प्रशासनाने घेतला असून देवळाली ऐवजी आता भुसावळ-इगतपुरी  मेमू  ट्रेनला १० जानेवारीपासून सुरवात होणार आहेत. या गाडीला मेल, एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट दर आकारले जाणार आहे. भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील सात स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही.
सध्या देशभरात कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोनाची पहिली, दुसरी लाट आटोपल्यावरही गाडी सुरू होत नसल्याने सातत्याने गाडी सुरू करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गुरुवारी नोटिफिकेशन काढले आहे.
भुसावळ-देवळाली ऐवजी आता भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी चालणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही गाडी १० जानेवारीपासून सुरू केली जाणार आहे. भुसावळ- इगतपुरी मेमू गाडी ही भुसावळ जंक्शनवरून सकाळी सातला सुटेल.  तर नांदगाव ला  १०.१० येईल नंतर १२.०८ ला मनमाड पोहोचेल व   इगतपुरीला दुपारी तीनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी इगतपुरी येथून सकाळी ९ .५ वाजता सुटेल. तर  दुपारी १.१३ मनमाडला व  नांदगांवला १. ४३ पोहोचेल. भुसावळ जंक्शनवर ही गाडी सायंकाळी ५. १० वाजता पोहोचेल.
ही गाडी आठ डब्यांची असणार आहे. मेल, एक्स्प्रेस गाडीचे दर आकारले जाणार आहे. मेमू ट्रेनची ट्रायल काल गुरुवारी (दि 6) घेण्यात आली. भुसावळहून या गाडीचा आलेला रेक रात्री साडेआठ वाजता मनमाड रेल्वे स्थानकामधून इगतपुरीकडे रवाना झाला. तर शुक्रवारी या गाडीचा रिकामा रेक इगतपुरीहून भुसावळ येथे रवाना रवाना होणार आहे.
पुढील पॅसेंजरचे हे थांबे रद्द -

भुसावळ-देवळाली शटल सर्व थांब्यावर थांबत होती. त्यातील पुढील स्थानकांवर मेमू गाडी थांबणार नाही. यात पिंपरखेड, पांझण, हिसवळ,  शिखर या स्थानकांवर ही गाडी थांबणार नाही.



No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....