नांदगांव (महेश पेवाल ) - नांदगांव शहरातील महात्मा गांधी चौक येथे शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थे तर्फे ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ माईना श्रद्धाजंली म्हणून आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी दत्तराज छाजेड़, पत्रकार मारुती जगधने, संतोष आण्णा गुप्ता, रोहिणी मोरे, पत्रकार भगवान सोनवणे, प्रशांत खैरनार, वामन पोतदार, सुनिल जाधव, सचिन साळवे, राजू गुडेकर यांनी आपल्या मनोगतातून माईंच्या जीवनप्रसंगावर प्रकाश टाकत माईंच्या कार्याची माहिती देत त्यांनी केलेल्या संघर्षातून त्या पुढे अनाथांची माय कशा झाली याबाबत बोलून शब्दसुमनांनी माईना श्रद्धाजंली अर्पण केली. तदनंतर विद्या देवरे मॅडम आणि खानदेशी आजी यांनी श्लोक पठनकरुन हार अर्पण करून सर्व नागरिकांनी माईंना श्रद्धाजंली अर्पण केली.या प्रसंगी सुमित गुप्ता, दिनकर आहेर, सोमनाथ दुसाने, आकाश पानकर, हेंमत पवार, बापू जाधव, महेश पेवाल, अनिल धामने, अभिषेक इंगे, ऋषिकेश डोबाले, अविद्र पारखे, परेश सिसोदिया, मुकुंद खैरनार, राजकुमार संत, मंसूरी सर, प्रविण सोमसे, संगिताताई सोनवणे, खुशाली सोनवणे, कुसुमताई सावंत, सोनाली पाटिल, आदि सदस्य उपस्थित होते.सूत्रसंचालन शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित गुप्ता यांनी केले.
Sunday, January 9, 2022
नांदगावात ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ माईना श्रद्धाजली अर्पण
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment