मांडवड ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यामधील मराठा विद्या प्रसारक समाज, संस्था संचलित जनता विद्यालय, मांडवड येथे २६ जानेवारी "प्रजासत्ताक दिन"उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.जी.खैरे यांनी करून उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या . त्यानंतर ध्वजपूजन शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय निकम व राष्ट्रीय ध्वजारोहन शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष माधव दादा काजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री विठ्ठलआबा आहेर, रामराव मोहिते, गंगाधर थेटे ,शालेय स्कूल कमिटी सदस्य अशोक भाऊ निकम, वाल्मीक थेटे, तसेच गावातील गावकरी प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाखेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आहेर व हेमंत परदेशी यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील एकवीरा ग्राउंडवर भव्य प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा दारा कंपनी आयोजित" मुज्जुभाई चष...
No comments:
Post a Comment