Saturday, February 19, 2022

नांदगावमध्ये मराठा समाजाचे आमरण उपोषण व अन्नत्याग आदोलनाचा ईशारा



नांदगाव( प्रतिनिधी) -  मराठा समाजाच्या  प्रलंबित मागण्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत. 
युवराज संभाजीराजे सोबत या लढ्यात सहभागी होण्याकरीता दि .२६ फेब्रु. रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व कुटुंबातील सर्व सदस्य  नांदगाव येथील शिवस्फुर्ती मैदानात  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसणार असुन अन्नत्याग आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
    महाराष्ट्राचे आराध्य दैवत लोक कल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज व आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज  यांच्या वंशजास आर्थिक व शैक्षणिक मागास मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण  करण्याची वेळ या महाराष्ट्र शासनाने आणल्या मुळे महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध या वेळी  नोंदवण्यात आला. या बाबतचे निवेदन तहसीलदार नांदगाव यांना देण्यात आले. निवेदनावर शिवभक्त संगिताताई सोनवणे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका उपाध्यक्ष  विशाल वडघुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण व  राकेश चव्हाण यांच्या सह्या होत्या.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...