नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय मांडवड हायस्कुल मध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे शालेय स्कूल कमिटी कमिटी अध्यक्ष माधव दादा काजळे होते.
व्यासपीठावर गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठलआबा आहेर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर आहेर मुख्याध्यापक खैरे.आर.जी. स्कूल कमिटी सदस्य अशोकभाऊ निकम,वाल्मिक थेटे,दत्तात्रय थेटे, महेश मोहिते,विजय आहेर,सोमनाथ नाझरकर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाने प्रतिकारात्मक अश्वरुढ छत्रपती शिवाजी महाराजांची लेझीम पथकाद्वारे गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी पोवाडा,शिवभक्ती गीते, भाषणे सादर केली.
मुख्याध्यापक खैरे आर.जी. यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार असून त्यांचे कुठल्याही धर्माविषयी युद्ध नसून अन्यायाविरुद्ध लढणारे युगपुरुष होते. आज चार शतकानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाल सर्वांना प्रेरणा देणार आहे, असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गौरवी चव्हाण व वर्षा निकम यांनी केले तर आभार उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीतील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment