नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना नांदगाव पालिका सेवेत सामावून घेण्यासाठी छेडण्यात आलेले उपोषण आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने त्रुटी विरहित कार्यवाही करण्याची हमी दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतल्याने गुरुवारी (दि. ३) दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसाहक्काने मयत व सेवानिवृत्त रिक्त सफाई कामगार पदावर नियुक्ती मिळावी यासाठी बुधवारी बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नांदगाव नगरपरिषदेसमोर आंदोलनकर्ते आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये होत चर्चा करण्यात आली . यावेळी नगरपालिका अधिकारी राहुल कुटे, गणेश पाटील, विजय कायस्थ यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून पालिका प्रशासन आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यास तयार असल्याचे सांगितले . यापुर्वी केलेल्या आंदोलनात आम्हाला असेच आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. मात्र, नसल्याचा प्रशासनाने परिपूर्ण प्रस्ताव दिले. आमची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली व त्रुटी विरहित कार्यवाही करण्याची लेखी हमी देण्याची मागणी करण्यात आली. सक्षम अधिकाऱ्याकडून लेखी हमी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment