नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहर व परिसरात मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. दोन वर्षापासून उत्सवावर कोरोनामुळे टाकण्यात आलेले निर्बंध दूर झाल्याने उधाण आले होते.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई, फुले व निळ्या पताकांनी सजविण्यात
आले होते. बारा बंगला, सहा बंगला, आनंदनगर, आंबेडकर नगर, एसटी कॉलनी, डीएम आहिरे चाळ, कैलासनगर, गांधीनगर आदी शहरातील विविध नागरी वस्तीमधून ढोल ताशांच्या निनादात बोलो बोलो जयभीम'च्या घोषणा देत आबालवृद्धांसह शेकडोच्या संख्येने मध्यरात्रीच्या बाराला आंबेडकरी अनुयायींचा गर्दीचा ओघ सुरूच होता. ठिकठिकाणी फटाक्यांच्या विविधरंगी आतषबाजीने या उत्साहाला वेगळे वलय निर्माण झाले होते. चारही बाजूने आलेल्या शोभायात्रा मध्यरात्री बाराच्या
सुमाराला डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पोहचल्या. तत्पूर्वी जयंतीच्या पूर्वसंध्येला अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने आयडलफेम आम्रपाली पगारे व संगीतकार सचिन पगारे सूत्रसंचाल राजुभाऊ गांगुर्डे यांणी 'मानवंदना भीमरायाला' हा स्वरसमृद्धी ऑर्केस्ट्राचा संगीतमय कार्यक्रम पार पडला. एकूणच उत्साह द्विगुणित करणाऱ्या कार्यक्रमाची सांगता रात्री बाराच्या सुमाराला करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक पंचशील व भीमस्तवनाने डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या वेळी माजी
नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. गुरूवारी घराघरांवर उभारलेल्या निळ्या झेंड्यांनी व पताकांनी सकाळ उगविली. सारनाथ बुद्धविहार ते आंबेडकर पुतळा अशी मिरवणूक निघाली. या ठिकाणी पुन्हा पु सामुदायिक पंचशील व भीमस्तवनाने व अभिवादन करण्यात आले.
रेल्वेचे निवृत्त चालक वसंतराव बनसोडे व दूरध्वनी विभागातील पु बळवंत वाकोडे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणेक ठिकाणी खिरदण करण्यात आले व अन्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आले संध्याकाळी उशिरा ठिकठिकाणी वेगवेगळ्या अशावेळी शोभायात्रा काढण्यात आले भीम गीता च्या तालावर व नुत्यासह शोभायात्रा काढण्यात आले.
No comments:
Post a Comment