Friday, April 15, 2022

आपला लढा हा मनुवादी विचारांविरूध्द - सरसेनानी आनंदराज आंबेडकर


नांदगाव ( प्रतिनिधी)-  आपला लढा हा मनुवादी विचारांविरूध्द आहे ज्यांना मनुवादी व्यवस्था आणायची आहे त्याविविरुध्द आहे.
संविधान सभेमधून आपण इशारा देत आहो की, जे कोणी संविधानकडे  डोळेवर कडून बघतिल त्याची डोळे काढून घेण्याची ताकद आंबेडकरी समाजामध्ये असल्याचे प्रतिपादन
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने ``संविधान के सन्मान बहुजन मैदान''  संविधान सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्यासपीठावर काँग्रेसचे प्रवक्ते   राजु वाघमारे, विशेष कार्यकारी अधिकारी राज्यमंत्री विजय बोरसे,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पुतणे दादाजी साठे व नातू सचिन साठे सुरज साठे, माजी आमदार अनिल आहेर, विनोद शेलार, श्रीकृष्ण रत्नपारखी, रिपाइंचे जिल्हा कार्यध्याक्ष देविदास मोरे, योगिता पाटील, विद्या कसबे, आदी मान्यवर उपस्थित होते.
     आंबेडकर पुढे म्हणाले की,देशावर अनेक राजवटींची आक्रमणे झाली. त्यामुळे देशाचा इतिहास गुलामगिरीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यांची ओळख निर्माण करुन दिली. त्यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला.

आंबेडकर पुढे म्हणाले की, आपल्याला जे सांगितले जाते त्यावर आपण विश्वास ठेवतो. खर तर आपण चौकस राहून सत्यता पडताळली पाहिजे. बाबासाहेबांनी समाजातील अन्यायग्रस्तांकरीता कार्य केले. त्यामुळे कामगार, महिला, शेतकरी यांसह विविध वर्गातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली. बहुजनांनी जागृत असणे आवश्यक आहे. संविधानामुळे  देश एकसंघ राहिला. धर्मा धर्मात शत्रुत्व नसावे.शिक्षित समाजाने चाकोरीबाहेर जाऊन देशाच्या प्रगतीचा विचार  केला पाहिजे. समता, बंधुत्व या विचारांमुळे देश अखंड राहतो.जाती धर्माची झापड काढून टाकून बाबासाहेबांचे विचार अंगीकारले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या विविध कार्यांची माहिती दिली.
दरम्यान,
या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना संविधान प्रत देऊन सन्मानीत करण्यात आले.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील विद्यालयात 'अत्याधुनिक संगणक लॅब' तून विद्यार्थ्यांना संगणकीय धडे मिळणार,

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील नाशिक शिक्षण प्रसारीत मंडळ संचलित स्व. मिश्रीलाल  भिकचंद छाजेड विद्यालयात नूतनीकरण करण्यात ...