मनमाड (प्रतिनिधी ) - साधारण एक दशकापूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मनमाड शहरातील पानेवाडी इंधन प्रकल्पाजवळ अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांची पेट्रोल माफियाकडून हत्या करण्यात आली होती.त्या घटनेनंतर पेट्रोल डिझेल चोरी होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या मात्र या सगळ्या फोल ठरल्या चोरी करणारे या ना त्या मार्गाने चोरी करतातच पण जेव्हा ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच जर चोरी करत असतील तर? हो अशीच घटना मनमाड नजीक असलेल्या पानेवाडी इंधन प्रकल्पात घडली असुन रेल्वेच्या प्रत्येक वॅगनमधून 5 ते 15 लिटर पेट्रोल काढून ते काळ्या बाजारात विकण्याचा गोरख धंदा गेले अनेक वर्षांपासून सुरू होता रेल्वेच्या आरपीएफ यांनी या प्रकरणात विठ्ठल रामचंद्र सांगळे या रेल्वे कर्मचाऱ्यांला त्याच्या साथीदारासोबत सापळा रचून अटक केली आहे.मात्र हे दोघेच होते की मोठे रॅकेट आहे याचा छडा लावण्याचे मोठे आवाहन आरपीएफ समोर उभे आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे कि शहरा पासून 6 किमी अंतरावर असलेल्या पानेवाडी येथे आव्हाड वस्तीवर इंधनाचा अवैध अड्डा असून तेथे रेल्वे रॅकच्या टॅंक मधून चोरी केलेले पेट्रोल डीझेलची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्या नंतर रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ अधिकारी क्षितीज गुरव,बी.पी.कुशवाह यांच्या आदेशानुसार प्रभारी निरीक्षक डी.के.मिश्रा,उपनिरीक्षक आर.एस.यादव,समाधान बहुलकर,आरपीएफ विठ्ठल नागरे,सागर वर्मा,मनीष कुमार,गजानन पाटील आदींच्या पथकाने सापळा रचून अड्ड्यावर छापा मारला. त्यांनी 75 लिटर आणि 50 लिटर डीझेलसह इतर साहित्य जप्त करून या प्रकरणी विजय दशरथ सांगळे आणि विठ्ठल रामचंद्र सांगळे (रा.पानेवाडी) या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे विठ्ठल हा रेल्वे कर्मचारी असून त्याची इंधन घेऊन आलेल्या रेल्वे रॅक टॅंकच्या सीलची देखभाल करण्याची जबाबदारी होती मात्र त्याने जबाबदारी पार पाडण्या एवजी इंधन चोरी सुरु केली अशी जोरदार चर्चा या भागात आहे.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षा पासून ही इंधन चोरी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे काहींनी तर इंधन चोरी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली आहे त्यामुळे इंधन चोरीचे एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्यात अनेक जणांचा समावेश असू शकतो त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने जर खोलात जाऊन तपास केल्यास अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येऊन काही मोठे मासे देखील त्यांच्या हाती लागू शकतात मनमाड पासून 4 ते 7 किमी अंतरावर नागापूर,पानेवाडी शिवारात इंडियन ऑयल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम चे इंधन प्रकल्प असून त्यातून टँकरच्या माध्यामतून राज्यभरातील पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा केला जातो टँकरचे सील आणि लॉकचे बनावट चाव्या तयार करून मोठ्या प्रमाणात इंधन चोरी केली जात होती.इंधन चोरी आणि अवैध विक्री यातून 2011 साली अप्पर जिल्हा धिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळण्याची घटना घडली होती.या घटने नंतर काही काळासाठी इंधन चोरी,अवैध विक्रीवर काही प्रमाणात आळा बसला होता मात्र अधून-मधून पुन्हा अशा घटना घडू लागल्या आता तर थेट रेल्वे रॅकच्या टॅंक मधून इंधन चोरी केली जात असल्याचे उघडकीस आल्यामुळे इंधन चोर पुन्हा सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे
--------------------------------------------------------
सखोल चौकशी व्हावी सत्य बाहेर येईल...!
पेट्रोल डिझेल चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे यात कधी टँकर मधून तर कधी पेट्रोल पंपावर भेसळ करण्यासाठी पेट्रोल डिझेल काढण्यात येते हा प्रकार सर्रास सुरू आहे यावर कोणाचेही नियंत्रण नाही तसेच इंधन कंपनीच्या आतमध्ये देखील अनेकदा चोरी झाल्याच्या घटना ताज्या आहेत यामुळे इंधन कंपनी व आरपीएफ अधिकारी यांच्या संमतीशिवाय येथून चोरी करणे अशक्य या प्रकरणी सखोल निःपक्षपाती चौकशी झाली तर सत्य जनतेच्याआ समोर येईल.
- गुरुकुमार निकाळे,रिपाई युवक तालुकाध्यक्ष...
--------------------------------------------------------
अवैध धंद्याना राजकीय वरदहस्त कुणाचा...?
यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड नंतर नाशिक जिल्ह्यातील तसेच जवळपास राज्यभरात अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.यानंतर काही काळ थांबलेले मनमाड शहरातील अवैध धंदे देखील बंद झाले होते मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाली मात्र या सर्व अवैध धंद्याना राजकिय वरदहस्त कुणाचा हा प्रश्न पुनः समोर उभा ठाकला आहे.
No comments:
Post a Comment