नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहर व परिसरात मोठ्या उत्साहात महात्मा जोतिराव फुले जयंती झाली. यानिमित्ताने सार्वजनिक उत्सव समितीतर्फे सकाळी दहाला राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आले. महात्मा फुले यांच्या विचारांचे विविध दाखले उद्धृत करणारी 'ठळक अवतरणे' सुशोभित करण्यात आले होते. यानिमित्ताने शहरात विविध ठिकाणच्या शैक्षणिक संस्था, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांत प्रतिमापूजन झाले. मुख्य कार्यक्रम शहरातील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळ झाला. आमदार सुहास कांदे, माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, विनोद शेलार यांनी महात्मा फुल्यांच्या अर्धपुतळ्यास अभिवादन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment