नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगांव शहरातील लेंडी आणि शाकंबरी नदीवर असलेले अतिक्रमण आज जमीनदोस्त करण्यात आले.नांदगांव मनमाड नगरपालिका कर्मचारी पोलीस तसेच महसूल विभागाने सामुहिक कारवाई करत आज हे वादग्रस्त मटण मार्केट पाडले मुळात ज्या वेळी रेल्वेच्या वतीने अंडरपास बनविले त्यावेळी या मटण मार्केट का हटविण्यात आले नाही याउलट ज्या गोष्टी अंडरपास साठी अडथळा वाटत होत्या त्या सोडून देण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.मटण मार्केट सोबत अनेक छोटेमोठे दुकाने समता मार्ग आणि भाजीपाला मार्केट जवळील अतिक्रमण व्यवसायिक दुकाने देखील हटविण्यात आल्याने अनेकांना आता व्यवसाय करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी सांगितले.तर मुळात 2004 नंतर मटण मार्केट व कत्तलखाने हे गावाच्या बाहेर बनविण्यासाठी अद्यादेश असताना नांदगांव नगर पालिकेच्या वतीने 2008 साली तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या इमारतीच उद्घाटन केलेच कसे असे विचारले असता याबाबत माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले. तर रात्री उशिरापर्यत कारवाई सुरु होती.
व्हीवो:- नदीपात्रात अतिक्रमण आहे तर ते पावसाळ्यात काढून पुन्हा बाकीचे 8 महिने का बसवले जाते पालिकेच्या वतीने व्यवसायिक गाळे उपलब्ध करून या नागरिकांचे पुनर्वसन का केले जात नाही अशा अनेक प्रश्न स्थानिक पातळीवर आहेत या मध्ये स्थानिक राजकारण आडवे येत असल्याचा आरोप देखील स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment