Friday, May 20, 2022

मराठा महासंघ पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर उभारणार


नांदगाव  (प्रतिनिधी)  - नांदगाव शिवस्फूर्ती मैदानावरील शिवस्मारकाचे जीर्णोद्धाराचे कार्य अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि आमदार सुहास अण्णा कांदे यांचे कार्य तत्परतेमुळे मार्गी लागले. अखेर 03 जानेवारी 2022 रोजी भुमीपुजन करीत एका नयनरम्य सोहळ्यात दि 13 मार्च 2022 रोजी *युवराज संभाजीराजे छत्रपती* यांच्या शुभहस्ते शिव मंदिराचे लोकार्पण झाले. 

आणि तेव्हा पासून मराठा महासंघाकडून जनतेच्या अपेक्षा वाढू लागल्या. याच भावनेतुन तालुक्यातील अनेक प्रलंबित विषयांवर मराठा महासंघा सोबत लोक चर्चा करू लागले,या चर्चेदरम्यान सन 1992 पासून प्रलंबित असलेला राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा विषय मराठा महासंघाने हाती घ्यावा अशी आग्रही मागणी होऊ लागली.
 मागणी रास्त आणि प्रलंबित असल्याने मराठा महासंघाने विषय हाती घेतला,

अत्यंत कमी कालावधीत विविध ठिकाणाहून या विषयावरील संपूर्ण माहिती गोळा करून शासन निर्णयामध्ये उल्लेख असल्या प्रमाणे पुतळा मराठा महासंघ स्वखर्चाने बसवणार असे जाहीर केले,परंतु या बातमीने संपूर्ण तालुक्‍यात खळबळ झाली,अनेकांच्या मनात शंका कुशंका निर्माण झाल्या की पुतळ्यास लागणाऱ्या लाखो रुपयांचा खर्च मराठा महासंघ कसा करणार. एक अविश्वासाचे वातावरण तयार झाले. त्यामुळे मराठा महासंघाने तातडीने मुर्तीकार यांचा शोध घेऊन अत्यंत कमी कालावधीत शासन निर्णयातील निष्कर्ष प्रमाणे ब्राँझ धातूची आकर्षक पुतळा तयार करून दि 1 मे 2022 या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पुतळा बहुजन समाजा समोर प्रदर्शित करून समाजामध्ये विश्वास निर्माण केला, 

पुतळा उभारण्याच्या परवानगीच्या प्रस्तावासाठी शासन निर्णया प्रमाणे एक वर्षाच्या आतील ठरावाची आवश्यकता होती. यामुळे नांदगाव नगरपालिकेचे 1992 पासून वेळोवेळी केलेले सर्व ठराव कुचकामी ठरले, आम्ही नांदगाव नगरपरिषदेकडे नवीन ठराव मागितला असता. त्यांनी सांगितले की नांदगाव नगर परिषद बरखास्त झालेली आहे,आता प्रशासकीय राजवट असल्याने धोरणात्मक विषयावरील ठराव आम्ही देऊ शकत नाही.

आमच्याकडे माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेले दस्त ऐवज एक वर्षाच्या आतील व नियोजित ठिकानाचे असेच आहे परंतु आम्हाला मिळालेल्या माहितीवरून मंदिरासाठी आमच्या परवानगीची गरज नाही,असे आम्हाला संबंधित  विभागाकडून सांगण्यात आले आहे, सकल धनगर समाजाने निर्णय घेतल्यास नांदगाव नगरपरिषदेच्या दस्तऐवजा प्रमाणे अखिल भारतीय मराठा महासंघ व सकल धनगर समाज बांधव एकत्र मिळून लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम काम करु शकतात.

लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती  निमित्ताने दि 28 मे रोजी इतिहास तज्ञ प्राध्यापक *डॉ.यशपाल भिंगे* सर (नांदेड) यांचे *व्याख्यान*, *महाप्रसाद* व दि 31 मे रोजी जयंतीची तयारी या सर्व नियोजित विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी आम्ही दि 17 मे 2022 रोजी हनुमान मंदिर नांदगाव येथे बैठक आयोजित केली होती, परंतु बैठकीस समाजातील अनेक मान्यवर सन्माननीय व्यक्ती उपस्थित राहू न शकल्याने ठोस निर्णय घेता आलेला नाही.

समाजाच्या कृतिशील सहभागाशिवाय हे सत्कार्य सिद्धीस जाणे अशक्य आहे.                          अखिल भारतीय मराठा महासंघ छत्रपतींच्या विचारांवर चालणारी शंभर वर्षांची परंपरा लाभलेली संघटना आहे,मराठा महासंघाला कोणत्याही प्रसिद्धीची आवश्यकता नाही,पुतळा नियोजित ठिकाणी विराजमान व्हावा या एकमेव प्रामाणिक हेतूने आम्ही काम करीत आहोत. मंदिर बांधकाम करण्याची जबाबदारी कोणी धनगर समाज बांधव घेणार असतील तर आम्ही पुतळा त्यांच्याकडे सुपूर्द करण्यास तयार आहोत,आणि लागेल ती मदत करण्यास तयार आहोत, त्यामुळे कोणीही कोणताही गैरसमज करून घेऊ नये.       

शासन निर्णया प्रमाणे *आम्ही स्वखर्चाने पुतळा उपलब्ध करून मराठा महासंघाने दिलेला शब्द पूर्ण केला आहे* आता पुढील कार्य समाजाच्या कृतिशील लोकसहभागातून व्हावे,हिंदू धर्म संस्कृती प्रमाणे कोणत्याही मंदिराचे संपूर्ण काम एका व्यक्तीने किंवा एका संस्थेने करू नये असे म्हटले जाते तेच योग्यही आहे,*मराठा महासंघ कोणत्याही परिस्थितीत शासकीय नियमांचे उल्लंघन करणार नाही,अधिकृत व कायदेशीर रीत्या व सर्व नियमांचे पालन करीत अहिल्यादेवी यांच्या मंदिर व पुतळ्याची स्थापना करेल,* तरी आम्ही येत्या रविवार दि 22 मेला
रोजी सकल धनगर समाजासोबत व बहुजन बांधवांसोबत पुन्हा एकदा जाहीर बैठक घेण्याचा प्रयत्न करून या संदर्भात चर्चा करून योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
सकल धनगर समाज बांधवांना सोबतीला घेऊन पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नांदगाव येथे मंदिर बांधन्याची  जबाबदारीचा स्विकार करणार आहोत,असे प्रसिद्धी पत्रक मराठा महासंघाचे तालुका प्रमुख,भिमराज लोखंडे यांनी जाहीर केले.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,

नांदगाव ( प्रतिनिधी ) -   नांदगाव येथील   व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी  ...