मंगळवारी नांग्या- साक्या धरणाच्या सांडव्याजवळ मृतदेह तरंगत असताना काही लोकांनी पाहिला. मृत अमोल व्हडगर रविवारी सांयकाळी घरातुन निघून गेला. मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही. मृत अमोल च्या नातेवाईकांनी दोन शोध घेण्याचा प्रयत्न केला, नंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात हरवल्याची फिर्याद दिली. पोलीसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असता मंगळवारी काही महाविद्यालयातील विद्यार्थी नाक्या- साक्या धरणाकडे फिरत असताना सांडव्याजवळ एक मृतदेह तंरगताना दिसला. त्यांनी यांची खबर पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी येत लगेच पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला . पोलीस उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे आदीनी भेट देत तपासाची चक्रे फिरवत खुन झालेल्या तरूणाचे संशयिताच्या नात्यातील महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन मृत तरुणाच्या वरातीतून बोलावुन त्याला दारू पाजून दोरीने गळा आवळला. त्याला ठार करून दोरीने हातपाय बांधून त्याला धरणात फेकुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. मृत अमोल व संशयित नांदूर ईथील रहिवासी आहेत. पोलीसाना मिळालेल्या माहितीआधारे अमोल व्हडगर यांचे संशयित गोविंदा वाळुबा केसकर, चैतन्य ( सोनू) साहेराव केसकर यांच्या नात्यातील महिलेशी जबरदस्तीने अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून खुन झाला आहे.
अमोलला वेळोवेळी समज देऊन तो जुमानत नव्हता , लग्नाच्या वरातीतून बोलावुन नाग्या- साक्या ईथे दारु पाजली दोरीने गळा आवळून व दोरीने हातपाय बांधून धरणात फेकले. या प्रकरणी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. उपविभागीय अधिकारी समिरसिंह साळवे , रामेश्वर गाढे, दिपक सुरडकर यांनी संशयिताना ताब्यात घेत खुनाचा उलगडा चोवीस तासात लावला.
No comments:
Post a Comment