नांदगांव (प्रतिनिधी ) : रस्त्यावर,दुचाकी व कारचा भीषण अपघात एक ठार तर दोन जखमी,अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट
नांदगाव शहराजवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बाहय वळण रस्त्यावर उड्डाणपूलाजवळ शुक्रवार (ता.२०) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास दुचाकी व कार चा भीषण अपघात होऊन दुचाकी वरील समाधान जगलू गायकवाड (वय २८) रा. इंदिरानगर कळमदरी ता .नांदगाव ठार तर विलास संजय धोत्रे व कार चालक असे दोन जखमी झाले.
अधिक माहिती अशी शुक्रवारी ( ता.२० ) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास, नांदगांव वरुन जात असताना साकोराहुन नांदगावच्या बाजुने येणारी इटोस कार M H 15 D S 9330, व दुचाकी बजाज प्लटीना मोटार सायकल यांच्यात भीषण अपघात झाला, अपघात इतका भंयकर होता कि अपघातानंतर मोटर सायकलने जागेवर पेट घेत जऴुन,खाक झाली. कार व दुचाकी यांच्या मध्ये समोरा -समोर धडक झाली कि कार ने दुचाकी ला पाठीमागून धडक दिली याबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरू होती. अपघात झाल्यावर मोटर सायकल,चालक समाधान जगलू गायकवाड़ व, विलास धोत्रे, रस्त्यावर अवस्थेत पडले त्यांना उपस्थितानी त्वरित उपचार करीता रुग्णवाहिकाने नांदगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले,त्यांची प्रकुती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी मालेगावला हलविण्यास आले मालेगावला जात असताना समाधान गायकवाड या जखमी युवकाचा मृत्यू झाला तर दुसरा गँभीर जखमी विलास धोत्रे वर उपचार सुरू आहे. कार चालक नाशिक येथील असून त्यात तीन प्रवाशी होते त्यांना दुखापत झाली नाही. समाधान हा इंदिरानगर, कळमदरी तालुका. नांदगाव येथील रहिवाशी असून त्याची घरची आर्थिक परिस्थिती हालखची असून मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्याचे मागील वर्षी लग्न झाले होते समाधानचा स्वभाळ मनमिळाऊ होता मेन उमेदच्या कळात समाधानचा अपघातात मृत्युची बातमी गावात पसरतात सर्वीकडे हळहळ व्यक्त करण्यात आली . नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये अपघातात ची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजु मोरे आदी तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment