नांदगाव (प्रतिनिधी)- नांदगाव नगरपरिषदेने केलेल्या ठरावाप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर उभारून पुतळा स्थापित करण्यासाठी मराठा महासंघ कटिबद्ध आहे. सदर मंदिराचे डिझाईन फायनल करण्यासाठी आणि जयंतीनिमित्त व्याख्यानासह इतर कार्यक्रम घेण्यासाठी दोनवेळा बैठकीचे आयोजन करून सुद्धा प्रचंड राजकीय दबावामुळे कोणीही हजर राहू शकले नाही. या परिस्थितीमुळे व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे यांनी दिली. नांदगाव नगरपरिषदेने केलेल्या ठरावाप्रमाणे मराठा महासंघाने अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर उभारणीसाठी पालिका प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळताक्षणी मंदिर उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल. आमचे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील, असेही श्री. लोखंडे यांनी सांगितले.
यावेळी मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाप्रमुख अशोक कदम, जिल्हा कार्याध्यक्ष कपील निफाडकर,तालुका प्रमुख भिमराज लोखंडे, उपाध्यक्ष बापुसाहेब जाधव,उप तालुका प्रमुख विशाल वडघुले,गणेश काकळीज,चिटणीस सुनील म्हस्के व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment