Thursday, June 9, 2022

मनमाडला मॉन्सूनपूर्व पाऊसाने झोडपले, वादळी वाऱ्यामुळे रेल्वे रूळावर झाडे उन्मळून पडली

          - रेल्वे रूळावर पडलेले झाड

मनमाड( प्रतिनिधी)- मनमाड काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रेल्वे रूळावर झाडे उन्मळून पडली. विजेच्या कडकडाटासह पाऊसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. मनमाडकर आधीच उकाड्यापासून हैराण झाले असताना , वादळीवाऱ्यामुळे झाडे विजच्या पोलवर पडल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सुसाट वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे उडून गेले. झाडे रेल्वे रूळावर पडल्याने ओरंगाबादकडे जाणारी रेल्वे वाहतूक धीम्या गतीने धावत होती. हवामान खात्याचे अंदाज खरे ठरल्याने मनमाडला सांयकाळी वादळी वाऱ्या, विजेच्या कडकडाटसह पाऊसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील इंडियन हायस्कुलचे पत्रे वाऱ्यामुळे रस्त्यावर येऊन पडले. तर औरंगाबादकडे जाणाऱ्या गाड्या तपोवन, संचखंड, जनशताब्दी एक्सप्रेस १ते २ तास उशिराने धावत होत्या. वादळी वारा , पाऊसामुळे नांदगाव - मनमाड रस्त्यावर असलेल्या बुरकुलवाडी सबस्टेशनकडून येणाऱ्या लाईनवरील अनेक पोल वाकले व पोल पडल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,

नांदगाव ( प्रतिनिधी ) -   नांदगाव येथील   व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी  ...