Friday, June 10, 2022

मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी संबंधीत आरोपीवर गुन्हे दाखल करण्यासाठी निवेदन


नांदगाव ( प्रतिनिधी) - ईस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लालाहू अलैही व सल्लम यांच्याविषयी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या  नुपुर शर्मा यांनी वादग्रस्त विधानाचे पडसाद भारतासह जगात उमटले. मुस्लीम देशांनी देखील या बेताल ,भडकाऊ विधानाचा निषेध केला. भारताला ही याविषयी अनेक देशांना स्पष्टीकरण द्यावे लागले. आज नांदगाव मधील जामा मस्जिद कमीटी व समस्त मुस्लीम समाजाच्या वतिने शांततेच्या मार्गाने, कोणतेही घोषणा न देता पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. वादग्रस्त विधान करणारी नुपुर शर्मा वर तात्काळ दाखल करण्यासाठी नांदगाव पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पैगंबर मोहम्मद सल्लालाहू अलैही व सल्लम यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक , तसेच तमाम मुस्लीम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी संबंधीत आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली गेली.               
     समस्त मानव जातीला शांततेचा, मानवतेचा संदेश देणारे प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लालाहू अलैही व सल्लम यांच्यबद्दल असभ्य, अत्यंत खालच्या पातळीवर बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रवक्ते नुपूर शर्मा यांच्या विरुध्द नांदगांव शहरातील आसाबा कब्रस्थान ट्रस्ट,जामा मस्जिद ट्रस्ट कमेटी व तमाम मुस्लीम बांधवाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी फिर्याद नोंदविण्यात आली. आरोपीवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक शासन करण्यात यावे,  जर संबधित आरोपीवर कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन करण्यास भाग पडेल मग होणाऱ्या  परिणामास शासन जबाबदार राहील यांची नोंद घेण्यात यावी. यावर मुस्लीम समाजाने प्रतिक्रिया देताना, " अल्लाह पाक है और उसके रसूल पाक , नापाक लोगो के घटिया बातो से उन के घटीया सोच से अल्लाह और उसके रसूल के शान मे जररा बराबर कमी नहीं आनेवाली हमे सब्र से काम लेना चाहिये.
मुस्लीम समाजा वतिने मुस्लीम समाजाला शांतता राखावी असे आवाहन केले.
           तसेच आरोपीवर निवेदनावर मा. नगरसेवक याकुब शेख, रियाज पठाण, अकील टेलर, आयाज भाई शेख, साजीद तांबोळी,सय्यद सबदर, मौलाना सुलेमान,इत्यादी च्या सह्या असून निवेदन सादर करतांना सय्यद सबदर, आसिफ युसुफ शेख, मुश्ताक शेख, जावेद शेख, रफिक भाई, बाबा भाई (आरको) , मोबीन खान, बब्बु रिक्षा, अखलाक शेख, आसबा कब्रस्थान मस्जिद चे सर्व मौलवी साहेब उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,

नांदगाव ( प्रतिनिधी ) -   नांदगाव येथील   व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी  ...