नांदगाव / मनमाड ( प्रतिनिधी) - आगामी होणाऱ्या नांदगाव , मनमाड नगरपरिषदेची निवडणुक पुढील महिन्यातील १८ अॉगस्ट ला होणार असून, तर मतमोजणी १९ अॉगस्ट आहे.
महाराष्ट्र राज्यातील ९२ नगरपरिषद आणि ४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर निवडणुक आयोगाकडून कार्यक्रम जाहिर करण्यात आला. नांदगाव , मनमाड नगरपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीचे पुढील महिन्यातील १८ ऑगष्ट रोजी मतदान होणार असून १९ ऑगष्ट ला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया २० जुलै पासून सुरू होणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशा नुसार २२ जुलै ते २८ जुलै पर्यत नामनिर्देशन पत्र भरावयाचे असून २९ जुलै रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी आहे. तर ४ ऑगष्ट माघारी ची तारीख असून ५ ऑगष्ट रोजी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे . निवडणुकीचे मतदान १८ ऑगष्ट रोजी होणार असून, १९ ऑगष्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
काही दिवसापुर्वी नांदगाव (क) नगरपरिषदेत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानूसार , १ ते १० प्रभागाचे आरक्षण निश्चीत करण्यात आले. आगामी निवडणुकीत १० प्रभाग असुन यापुढे नव्या प्रभागरचनेनुसार नगरपरिषदेत २० सदस्यसंख्या असतील. आधी सदस्यसंख्या १७ होती. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य निवडुन येतील. महिलासाठी १० राखीव जागा असल्याने पुढील समीकरणे काय असेल येणारा काळ ठरवेल.
मनमाड (ब) नगरपरिषदेत एकूण 16 प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने विद्यमान आणि काही भावी नगरसेवकाचा हिरमोड झाला आहे. मनमाड शहरात नव्या प्रभाग रचनेत एकूण ३३ नगरसेवक असणार आहेत. निवडणुकीसाठी असणारे आरक्षण जाहीर झाल्याने ईच्छुकांनी नेतेमंडळी कडे भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
नांदगाव , मनमाड नगरपरिषदेची तारखा जाहिर झाल्याने नेतेमंडळी, कार्यकर्ते ही प्रचारासाठी व्यस्त आहे. राज्यात नवीन सरकार विराजमान झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक आणखी चुरशीची होणार आहे. नांदगाव , मनमाड नगरपरिषदे च्या निवडणुकीत विविध पक्ष जोर लावणार असून , सत्ता कोणाकडे जाते मतदारराजा मतपेटीतून ठरवेल.
No comments:
Post a Comment