Tuesday, February 3, 2026

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,










नांदगाव (प्रतिनिधी) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभा पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदाणे यांनी भूषविले. यावेळी स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष सागर हिरे यांची निवड करण्यात आली. या विशेष सभेत सार्वजनिक वांधकाम समिती, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती, नियोजन व विकास समिती, पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समिती तसंच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व सदस्यांची निवड करण्यात आली. नांदगाव नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता असून, वीसपैकी एकोणवीस नगरसेवक शिवसेनेचे तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. विरोधकांना खातं उघडण्यात यश आलेले नाही. मंगळवारी रोजी झालेल्या या विशेष सभेसाठी तहसीलदार सुनील सौदाणे यांची पिठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. बैठकीत पुढीलप्रमाणे विषय समित्यांची रचना करण्यात आली. या प्रसंगी मुख्याधिकारी शामकांत जाधव, नगराध्यक्ष सागर हिरे नगरसेवक व नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- स्थायी समिती सभापती - सागर हिरे (नगराध्यक्ष),
सदस्य - काशिनाथ देशमुख, रूपाली पाटील, राजेश शिंदे, सईद शेख, विद्या कसबे

) सार्वजनिक बांधकाम समिती - सभापती : काशिनाथ फकिरराव देशमुख, सदस्य - पृथ्वीराज शिरीष पाटील, किरण जयप्रकाश देवरे, स्वाती अमोल नावंदर, योगिता सचिन खरोटे

) स्वच्छता , वैधक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती - रूपाली चेतन पाटील , सदस्य - वाळू गोपाळा शेवरे, काका वनाजी सोळसे, स्नेहल सूरज पाटील, दत्तराज रामनलाल छाजेड

) नियोजन व विकास समिती सभापती - राजेश भागवत शिंदे, सदस्य - वंदना चंद्रशेखर कवडे, खान जुबेदावी गफ्फार खान, दिपक प्रमोद पांडव, राखी महावीर जाधव

४) पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समिती सभापती - सईद रशीद शेख, सदस्य- वाल्मीक हरिदास टिळकर, गायत्री प्रकाश शिंद, स्वाती अमोल नावंदर, किरण जयप्रकाश देवरे

५)महिला व बालकल्याण समिती सभापती - विद्या अभिमान कसबे, सदस्य - शोभा नेमीचंद कासलीवाल, योगिता सचिन खरोटे, गायत्री प्रकाश शिंदे, कल्पना वाल्मिक जगताप


No comments:

Post a Comment

नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्यांची निवड,

नांदगाव (प्रतिनिधी ) - येथील नांदगाव नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीसाठी नगरपरिषद कार्यालयात विशेष सभ...