Thursday, August 11, 2022

नांदगावच्या व्ही.जे.हायस्कूल मध्ये शाडूमातीपासून गणपती तयार करणे कार्यशाळा संपन्न,



नांदगाव (   प्रतिनिधी  ) - नांदगाव शहरातील  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ,नाशिक संचलित आयोजित  येथील व्ही.जे.हायस्कूल या शाळेत शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच पद्धतीने संपन्न झाली.या विद्यालयात गेल्या १४ वर्षांपासून शाडूमातीपासून गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. कलेच्या माध्यमातून पर्यावरण पुरक उत्सव साजरा करण्याच्या मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून तसेच मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी   विद्यालयातील दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.या वर्षी या कार्यशाळेत १७५  विद्यार्थी सहभागी झाले .
  या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे  पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री.डॉ.गणेश चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते सुमित सोनवणे ,मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड ,पर्यवेक्षक मनोहर शिंदे,भैय्यासाहेब चव्हाण उपस्थित होते  प्रमुख पाहुण्याच्या हस्ते  गणेशाच्या मूर्तीचे व शाडू मातीचे पूजन करून कार्यशाळेचे  उद्घाटन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैय्यासाहेब चव्हाण  यांनी केले.प्रस्ताविकात त्यांनी संस्थेने या चालविलेल्या उपक्रम राज्यातील इतर संस्था व शाळा नीही हाती घेतला आहे असे सांगून त्यांनी शाळेत आयोजित केल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली.डॉ.गणेश चव्हाण यांनी  विद्यार्थ्यांना इकोफ्रेंडली गणेश उत्सव साजरा करून पर्यावरण संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले असे सांगून विद्यालयाने सर्व गावापुढे आदर्श निर्माण करणारा उपक्रम १४ वर्षापासून राबविल्या बद्दल कौतुक केले. मुख्याध्यापिका जोत्स्ना आव्हाड यांनी कार्यशाळेसाठी उपस्थित विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या व उपस्थित  सर्व प्रमुख पाहुण्याचा सत्कार  केला.
      कार्यशाळा प्रमुख कलाशिक्षक विजय चव्हाण ,चंद्रकात दाभाडे,ज्ञानेश्वर डंबाळे यांनी ग्रुप करून शाडूमातीची गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रत्यक्षिक दाखवून गणेश मूर्ती तयार करून दाखविल्या .माती मळण्यापासून तर गणपतीचे सर्व भाग कशा पद्धतीने बनवायचे याचे बारकावे हि सांगण्यात आले यानंतर संपुर्ण दिवसभर कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या व विविध भावमुद्रा असलेल्या आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. या कार्यशाळेत एकूण १७५  मूर्ती तयार झाल्या .बनविलेल्या मूर्ती सुकल्यावर विद्यार्थांना रंगकाम कसे करायचे याची माहिती देऊन रंगकाम करून घेणार आहेत विद्यार्थी तयार झालेल्या मूर्तीची स्थापना आपल्या घरी करणार आहेत .
या कार्यशाळे साठी उपमुख्याध्यापक मनोहर बडगुजर ,भास्कर मधे,गुलाब पाटील ,प्रियंका पाटील,संगीता शिंदे,सुनिता देवरे  तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,

नांदगाव ( प्रतिनिधी ) -   नांदगाव येथील   व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी  ...