Monday, August 15, 2022

नांदगांवच्या गणेशवाडीत हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक, हिंदु आणि मुस्लीम महिलांनी मिळुन केला अमृतमहोत्सव साजरा..!


नांदगांव(प्रतिनिधी):-   आज दि. १५ अॉगस्ट रोजी  स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.   नांदगाव शहरात स्वतंत्र भारताचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा या मोहिमेला देखील ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक देखील अनेक ठिकाणी बघावयास मिळाले आहे.‌ नांदगाव तालुक्यातील गणेशवाडी येथील मोमीनवाडा मधील मुस्लिम महिला व हिंदू महिलांनी मिळुन आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.येथील सामाजिक कार्यकर्त्या शिवभक्त सांगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज इमारतीवर 20 फुटाचा तिरंगा ध्वज लावण्यात आला तर या भागातील सर्व घरावर आकर्षक विद्युत रोषणाई करत रांगोळ्या काढून फुले लावून सजवण्यात आले होते. पालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे, अभियंता राहुल कुटे सौ कुटे यांनी या ठिकाणी येऊन ध्वजारोहण करून सलामी दिली या भागांतील सर्व धर्माच्या महिलांनी यावेळी सहभाग नोंदवला होता. यावेळी सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला तर मिठाई वाटप करून लहान मुलांना खाऊ वाटण्यात आला. आजच्या या छोटेखानी कार्यक्रमामुळे हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतिक बघावयास मिळाले.

No comments:

Post a Comment

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!

नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...