नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरामध्ये स्वतंत्रदिनाच्या अमृत महोत्सव साजरा करताना शासनाच्या वतीने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचे पालन करत शाळांनी तसे नियोजन केलेही या सर्वात विदयार्थी हा महत्वाचा घटक असतो. आजच्या विद्यार्थ्यांमध्ये जे संस्कार आपण देवू राष्ट्रनिष्ठेची, देश भावनेची, एकात्मतेची जी भावना त्यात रुजवू तेच या देशाचे भवितव्य घडविणारं आहे. १५ ऑगस्ट हा आपणा सर्व भारतीयांचा राष्ट्रीय सन आहे आज आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून ७५ वर्षे पूर्ण झाली असून, याचा आनंद साजरा करताना गोडवा निर्माण होवून तो कायम टिकून राहवां आपला सर्वांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने नांदगाव नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना तिरंगी लाडू वाटप करण्यात आले. या प्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष सईद हाजी, आयाज शेख, रियाज पठाण, अमजद पठाण, अक्रम शेख , नईम भाई, इम्रान भाई, फहीमभाई, नसिरभाई, तन्वीर भाई, आरीफ भाई ई. तसेच मुस्लीम समाज समन्वय समिती चे हाजी जहीर, चिराग सेठ, गयास टेलर, खलील जनाब, नदीमभाई साजीद तांबोळी, अख्तर शेख, सोहेलभाई, वजीर बाबा,लतिफ सुपर,महमूद टेलर, असगर पठाण, मुश्ताक फीटर, फिरोज मुल्ला, अन्सारभाई तसेच असंख्य मुस्लीम तरुण उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment