नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे स्थानकावरील गाड्याच्या थांब्या करीता "आम्ही नांदगावकर, प्रश्न-माझ्या गावाचा " या आशयाचे फलक लावत काही दिवसापूर्वी सर्वाचे लक्ष वेधले होते. रेल्वे प्रशासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी उद्या दि. १६ अॉगस्टला सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत नांदगाव शहरातील महात्मा गांधी चौक येथे धरणे आदोलन करण्यात येणार आहे. नांदगावकरांनी उपस्थित राहुन गाड्या थांबा मिळून देण्याकरीता सहभाग नोंदविण्यास सांगण्यात आलेले आहे. नांदगाव रेल्वे थांबे , पादचारी पुल तसेच अशा अनेक समस्या सुटण्यासाठी या शांततामय व कायदेशीर आदोलन असेल, तहसिलदारांना दिलेल्या परवानगीच्या पत्रात विनंती करण्यात आलेली आहे. सर्व गाड्याचा थांबा नसल्याने यामुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी यांचे हाल होत आहे. विकासात रेल्वे गांड्याचे थांबे महत्वाचे तरच शहराची कनेक्टीविटी वाढते, यामुळे प्रगती चालना मिळते असते. प्रवाशी ही रेल्वेतून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. यासाठी कोविड-19 काळापूर्वी थांबणाऱ्या सर्व एक्सप्रेस ट्रेन्स ला नांदगाव स्टेशनवर पुन्हा थांबे बहाल करावे , नांदगावकर अशी मागणी करत आहे . रेल्वे थांबा मिळावा यासाठी शहरात बॅनरबाजी , रिक्षाला भोंगा लावून नांदगावकरांना माहिती दिली जात आहे. रेल्वे प्रशासनाने फक्त काशी , महानगरी एक्स्प्रेसला दोन गाड्याना थांबा दिला आहे. तर जनता, कुर्शीनगर, झेलम, कामायनी, शालीमार, हुतात्मा एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी आहे. नांदगावकर बाकी गाड्यासाठी मागणी लावून धरत आहे. प्रवांशाच्या सोयी होईल अशा रेल्वे गाड्याना थांबा मिळणे गरजेचे आहे . नांदगावकर मागणीसाठी काय भूमिका मांडतात यासाठी धरणे आदोलनांकडे बघितले जात आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment