मनमाड (प्रतिनिधी)- मनमाड शहरात रविवारी दि. २१ अॉगस्ट रोजी निषेध मोर्चा , आंदोलन करण्यात आले होते. गुजरातच्या बिल्किस बानो प्रकरणातील आरोपीना माफी देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे सरकार व राजस्थान येथील इंद्र मेघवाल हत्याकांड हे वरील प्रकरण १५ ऑगस्ट अमृत महोत्सव दिवशी घडल्याने त्याचा गुजरात येथिल बिल्कीस बानो प्रकरण, राजस्थान येथिल इंद्र मेघवाल प्रकरण, तर महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली येथे आदिवासी महिलेवर झालेला अत्याचारांच्या याविरोधात मनमाड शहरात सर्व स्तरातून निषेध करण्यात आला . शहरात भव्य अशी निषेध रॅली काढून राजस्थान सरकार, गुजरात सरकार, प्रशासन ,मनुवादी प्रवृत्ती यांचे विरोधात घोषणा देत परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी पोलीस प्रशासनाला मागणीचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनात सहभागी सर्व सामाजिक संघटना , सर्व समाजाचे लोक, संस्था, महिला, मित्रमंडळ शहरातील, राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment