नांदगाव (प्रतिनिधी) - आज गुरुवारी दि. २२ रोजी नांदगाव नगरपरिषद मध्ये पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदगाव यांच्या साह्याने २१ महिला बचत गटांना प्रत्येकी रुपये १०००००₹ कर्ज रकमेचा धनादेश नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी उपस्थित महिला बचत गटाच्या सदस्यांना उद्योग व्यवसायाबाबत तसेच नियमित बचत करून कर्ज परतफेड करणे बाबत मार्गदर्शन केले.
या वेळी २१ बचत गटातील सुमारे २०० पेक्षा अधिक महिला उपस्थित होत्या. बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी पी. ए. हनुमंते , शिंदे , सहाय्यक प्रकल्प अधिकारी आनंद महिरे , समुदाय संघटक विजया धनवट, क्षेत्रिय समन्वयक बिजला गंगावणे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment